मराठी बातम्या /बातम्या /देश /कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मिळणार केंद्रात जागा, BJP सोपवणार मोठी जबाबदारी?, भाजप नेत्याचा दावा

कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मिळणार केंद्रात जागा, BJP सोपवणार मोठी जबाबदारी?, भाजप नेत्याचा दावा

पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे.

पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे.

पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे. हा दावा एका भाजप नेत्यानं केला आहे. असं म्हटलं जात आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंह लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. पंतप्रधानांना भेटल्यानंतर कॅप्टन यांना कृषीमंत्रीही बनवले जाऊ शकते, असा दावा भाजप नेते हरजीत गरेवाल यांनी केला आहे.

हरजीत गरेवाल यांनी म्हटलं की, कॅप्टन यांना स्वतःची भूमिका ठरवायची असते, त्यांची भूमिका कोणीही ठरवू शकत नाही. भाजप नेते म्हणाले की, मोदींना चांगले लोक आणणे आवडते. कॅप्टन यांची पंतप्रधानांसोबतच्या भेटीची बातम्या अशा वेळी समोर आली आहे की, जेव्हा पंजाब काँग्रेसमध्ये कलह सुरु आहे आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनी पीपीसीसी पदाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा- दुर्घटना: बस नदीत कोसळली;  4 जणांचा मृत्यू, अद्यापही प्रवाशांचा शोध सुरु 

अमरिंदर सिंह अजित डोवाल यांच्या भेटीला

काल केंद्रीय मंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर आज कॅप्टन सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (National Security Advisor Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. न्यूज 18 चे रिपोर्टर यतेंद्र शर्मा यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. यतेंद्र शर्मा म्हणाले की, पंजाबमधील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन ही बैठक महत्त्वाची मानली जाते. काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अजित डोवाल यांची भेट घेतली.

काल घेतली अमित शहांची भेट

बुधवारी अमरिंदर सिंह (Ex CM of Punjab Amarinder Singh meets Amit Shah in Delhi) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. अमरिंदर सिंह काँग्रेसमध्ये (Talks of Amarinder Singh to join BJP) नाराज असून लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना या भेटीमुळे पुन्हा उधाण आलं आहे. मात्र, अमरिंदर सिंह यांचा दिल्ली दौरा (Personal reason) हा वैयक्तिक कारणांसाठी असून ते आपल्या दिल्लीतील निवडक मित्रांना भेटणार असल्याचं त्यांच्या प्रसिद्धी प्रमुखांकडून सांगण्यात आलं.

हेही वाचा- SRH vs CSK, Dream 11 prediction : 'हे' 11 खेळाडू बनवू शकतात तुम्हाला मालामाल

मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर भाजप प्रवेशाची चर्चा

पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादानंतर अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. काँग्रेसनं चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. मुख्यमंत्रीपदानंतर आता अमरिंदर सिंह काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे.

हेही वाचा- Explainer: काँग्रेसमध्ये खिंडार, गेल्या 7 वर्षांत 177 नेत्यांचा पक्षाला रामराम

अमरिंदर सिंह यांचं भाजप प्रवेशावर स्पष्टिकरण

आपण भाजपात जाणार नाही, मात्र काँग्रेसमध्येही राहणार नाही, (Won't go to BJP but not stay in Congress says Amarinder Singh)असं विधान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केलं आहे. पंजाबमधील नव्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा झटका (Big jolt to Congress) मानला जात आहे. एका मुलाखतीत कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून ‘ना काँग्रेस-ना भाजप’ (No Congress and No BJP) असं धोरण निश्चित केल्याची घोषणा केली आहे.

First published:

Tags: BJP, Punjab