जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / SRH vs CSK, Dream 11 prediction : 'हे' 11 खेळाडू बनवू शकतात तुम्हाला मालामाल

SRH vs CSK, Dream 11 prediction : 'हे' 11 खेळाडू बनवू शकतात तुम्हाला मालामाल

SRH vs CSK, Dream 11 prediction : 'हे' 11 खेळाडू बनवू शकतात तुम्हाला मालामाल

आयपीएल स्पर्धेच्या 44 व्या मॅचमध्ये गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) लढत सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेच्या 44 व्या मॅचमध्ये गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) लढत सनरायझर्स हैदराबादशी  (Sunrisers Hyderabad) होणार आहे. शारजा क्रिकेट स्टेडियममध्ये ही लढत होणार हे. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वाखाली खेळणारी चेन्नई सुपर किंग्सची टीम (CSK) सध्या पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 आहे. तर दहापैकी आठ सामने गमावलेली सनरायझर्सची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही टीमनी त्यांची शेवटची मॅच जिंकली आहे. चेन्नईनं मागील तीन मॅच सलग जिंकत ‘प्ले ऑफ’ मधील जागा जवळपास निश्चित केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्यांनी अगदी शेवटच्या बॉलवर विजय मिळवला होता. ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या विजयाचा हिरो ठरला. त्यानं 8 बॉलमध्ये 22 रन केले होते. फाफ ड्यू  प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी टीमला चांगली सुरुवात करुन दिली. तर मोईन अली, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांच्यामुळे चेन्नईची बॅटींग ऑर्डर भक्कम आहे. IPL 2021: मैदानातील वादावर अश्विनचं खणखणीत उत्तर, मॉर्गनला समजावली ‘Spirit of the game’ ची व्याख्या हैदराबाद टीमकडं आता गमावण्यासारखं काहीच नाही. पंजाब विरुद्ध मिळवलेल्या विजयानं त्यांचा आत्मविश्वास  उंचावला असेल. जेसन रॉयनं मागील सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्याच्यासह केन विल्यमसनवर हैदराबादच्या बॅटींगची मदार असेल. तर बॉलिंगमध्ये अनुभवी राशिद खान, जेसन होल्डर आणि राशिद खान यांना त्यांची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. ORANGE CAP: SRH vs CSK Dream 11 कॅप्टन : केन विल्यमसन व्हाईस कॅप्टन - ऋतुराज गायकवाड विकेट किपर - महेंद्रसिंह धोनी बॅट्समन - फाफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, जेसन रॉय, केन विल्यमसन ऑल राऊंडर्स - रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो बॉलर - राशिद खान, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार संभाव्य टीम सनरायझर्स हैदराबाद : जेसन रॉय, वृद्धीमान सहा, केन विल्यमसन (कॅप्टन), प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दूल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौल चेन्नई सुपर किंग्स : फाफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जोश हेजलवूड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: csk , IPL 2021 , SRH
  • First Published :
जाहिरात
जाहिरात