Home /News /national /

बस नदीत कोसळून 4 जणांचा मृत्यू, 16 हून अधिक प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु

बस नदीत कोसळून 4 जणांचा मृत्यू, 16 हून अधिक प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु

एक मोठी दुर्घटना घडली आहे. बस नदीत कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

    मेघालय, 30 सप्टेंबर: मेघालयमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. तुरा (Tura) हून शिलाँग(Shillong) ला प्रवाशांनी भरलेली बस गुरुवारी सकाळी अचानक रिंगडी नदी (Ringdi River) येथे कोसळली. या बस दुर्घटनेत (Bus Accident)आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. रिंगडी नदीतील पाण्याच्या वाहत्या प्रवाहामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. बसमध्ये उपस्थित इतर प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस दुर्घटनेत जखमी झालेल्या 16 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी प्रवाशांनी भरलेली बस तुरा येथून शिलाँगसाठी निघाली होती. बस नुकतीच नोंगचरममधील रिंगडी नदीजवळ पोहोचली होती. तेव्हा बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ती बस रेलिंग तोडून नदीत पडली. बस नदीत पडताच पलटी झाली. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले ईस्ट गारो हिल्स पोलीस बसमधील प्रवाशांना बाहेर काढत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नदीत पाण्याच प्रवाह जास्त असल्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. मात्र पोलीस आणि प्रशासन सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. हेही वाचा- SRH vs CSK, Dream 11 prediction : 'हे' 11 खेळाडू बनवू शकतात तुम्हाला मालामाल  ईस्ट गारो हिल्सचे उपायुक्त स्वप्नील तेम्बे यांनी सांगितलं की, दोन प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. आम्ही अपेशा करतो की, त्यांचा लवकरच शोध लागेल. बसमध्ये 21 प्रवासी होते ईस्ट गारो हिल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघालय ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस नदीत कोसळली. तेव्हा बसमध्ये 21 प्रवासी प्रवास करत होते. राजधानीपासून सुमारे 185 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. बस दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव आणि आपत्कालीन सेवांची टीम घटनास्थळी पोहोचली. बचाव कार्य अजूनही सुरू आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Accident, Meghalaya

    पुढील बातम्या