अहमदाबाद, 02 मे : पुलवामा हल्ल्यावरून गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. पुलवामा हल्ला हा गोध्रा हत्याकांडाप्रमाणे भाजपचा कट होता असा गंभीर गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. यावर अधिक बोलताना, निवडणुका जिंकण्यासाठी भाजप दहशतवादाचा उपयोग करत असल्याचं देखील शंकरसिंह वाघेला यांनी म्हटलं आहे. तसेच, बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये कुणीही मारलं गेलं नाही. कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेनं बालाकोटमध्ये 200 दहशतवादी ठार झाल्याचं म्हटलं नाही. हा सर्व कटाचा भाग असल्याचं वाघेला यांनी म्हटलं आहे.
Pulwama attack was BJP's conspiracy just like Godhra, says Shankersinh Vaghela
— ANI Digital (@ani_digital) May 2, 2019
Read @ANI story | https://t.co/xwlW2BChdh pic.twitter.com/82wwiMoZue
मोदी सरकारबाबतचं वक्तव्य, राहुल गांधींना पुन्हा निवडणूक आयोगाकडून नोटीस सुरक्षेची काय काळजी घेतली? पुलवामा हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांनी कल्पना दिली होती. पण, त्यानंतर काय खबरदारी घेतली गेली? असा सवाल देखील यावेळी वाघेला यांनी विचारला आहे. तुमच्याकडे बालाकोटमधील दहशतवाही तळांबाबत यापूर्वीच माहिती होती. तर, मग एअर स्ट्राईक करण्यासाठी पुलवामा सारख्या हल्ल्याची वाट का पाहिली? असा सवाल देखील यावेळी वाघेला यांनी उपस्थित केला आहे. या सर्वामध्ये भाजपचा सहभाग आहे. शिवाय, लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वकाही केल्याचा गंभीर आरोप वाघेला यांनी केला. यापूर्वी देखील अनेकांनी पुलवामा हल्ल्याबाबत भाजपवर गंभीर आरोप केलेत. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवलं म्हणजे नेमकं काय? पुलवामा हल्ला 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी दहशवादी हल्ला केला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत 200 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तणावाचं देखील वातावरण आहे. तर, दहशतवाद्यांना सोडणार नाही असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. SPECIAL REPORT : अशा प्रकारे माओवाद्यांनी केला भ्याड हल्ला