मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवलं म्हणजे नेमकं काय?

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवलं म्हणजे नेमकं काय?

एखाद्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवले जाते म्हणजे नेमके काय होते हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 मे: जैश-ए-मोहम्मदचा मोरक्या मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. फ्रान्सच्या या ठरावाला 151 देशांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे अजहरला दहशतवादी ठरवण्यासाठीच्या प्रस्तावाला दोन वेळा विरोध करणाऱ्या चीनने यावेळी भारताची साथ दिली. एखाद्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवले जाते म्हणजे नेमके काय होते हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

वाचा: 20 वर्षांपूर्वीच्या 'त्या' घटनेनंतर भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरला होता मसूर अझहर

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने 1998मध्ये एक प्रस्ताव मंजूर केला होता. हा प्रस्ताव 1267 या नावाने ओळखला जातो. सुरक्षा परिषदेने हा ठराव अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी केला होता. दहशतवादी किंवा त्यांच्या संघटनांना आर्थिक मदत मिळू नये यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गेल्या 20 वर्षात 100 हून अधिक दहशतवादी आणि संघटनांवर बंदी घालून त्यांची आर्थिक नाकेबंदी केली आहे.

एखाद्या दहशतवाद्याविरुद्ध किंवा संघटनेविरुद्ध हा ठराव मंजूर झाल्यानंतर त्याचे खालील परिणाम होतात.

पाहा- SPECIAL REPORT : कोण आहे आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझर!

1) आर्थिक नाकेबंदी- ज्या संघटना अथवा दहशतवाद्याविरुद्ध हा ठराव मंजूर होतो. त्याची सर्व बँक खाती सील केली जातात. ज्यामुळे कोणत्याही प्रकारची शस्त्रे अथवा अन्य कोणतेही गैर कृत्य करण्यासाठी त्यांना संधी मिळू नये.

2)देश सोडता येत नाही- आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवल्यानंतर संबंधित व्यक्तीला संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य असलेला कोणताही देश व्हिसा देत नाही. म्हणजेच तो ज्या देशात आहे. तो देश सोडून त्याला जाता येत नाही.

3) शस्त्र खरेदीवर मर्यादा- या ठरावानुसार संबंधित दहशतवादी ज्या देशात असतो त्या देशाने त्याला शस्त्रे मिळणार नाहीत याची काळजी घ्यावयाची असते. आता पाकिस्तानची ही जबाबदारी ठरते की तो मसूद अजहरला किती रोखू शकले.

वाचा- एक थोबाडीत खाताच मसूद अझहरनं दिली होती दहशतवादी कारवायांची माहिती

याआधी हाफिस सईदला देखील आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र नंतर देखील तो दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. उरी आणि पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मसूद अजहर हात होता. त्याआधी भारताच्या संसदेवर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड अजहरच होता. 1999च्या कंदहार विमान अपहरणात त्याची सुटका झाली होती.


SPECIAL REPORT : कोण आहे आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2019 08:03 PM IST

ताज्या बातम्या