नवी दिल्ली, 2 मे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस देण्यात आलीय आहे. केंद्रातील मोदी सरकारने आदिवासींना गोळ्या घालण्याचा कायदा केला असल्याचं विधान राहुल गांधींनी केलं होतं. याबाबत भाजपने केलेल्या तक्रारीनंतर राहुल गांधींना नोटीस पाठवण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील शहडोल इथं बोलताना राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, 'मोदींनी असा कायदा केला आहे की, ज्यानुसार आदिवासींना गोळ्या झाडल्या जाऊ शकतात.' राहुल गांधींच्या या वक्तव्याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर राहुल यांचं हे वक्तव्य आचार संहितेचं उल्लघन केलं आहे, असं म्हणत त्यांना नोटीस देण्यात पाठवण्यात आली आहे. तसंच 48 तासांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राहुल गांधी याआधीही अडचणीत
राफेल प्रकरणी केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोर्टाची माफी मागावी लागली आहे. राफेल प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी 'चौकीदार चोर है' असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. पण आम्ही असं कोणतंही विधान केलेलं नाही, असं स्पष्टीकरण कोर्टाने दिलं.
खेद नाही, माफी हवी
राहुल गांधी यांच्यातर्फे त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, मी तीन चुका केल्या आणि त्याबद्दल मी माफी मागतो. सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन मी जे म्हटलं ते चुकीचं होतं. पण अभिषेक मनु सिंघवी यांच्या या माफीनाम्याने कोर्टाचं समाधान झालं नाही.
VIDEO : 'लेक आणि नातू हरणार याचं पवारांना दु:ख', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल