भोळ्या चेहऱ्यामागे दहशतवादी! पुलवामा प्रकरणी लेकीसह बापाला अटक

भोळ्या चेहऱ्यामागे दहशतवादी! पुलवामा प्रकरणी लेकीसह बापाला अटक

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं आणखी दोन लोकांना ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मार्च : गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं आणखी दोन लोकांना ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामा हल्ल्यात हात असल्याच्या आरोपाखाली बाप-लेकीला ताब्यात घेतलं आहे. आतापर्यंत या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

याआधी तपास संस्थेनं 28 फेब्रुवारीला या प्रकरणी पहिल्यांदा एका संशयिताला अटक केली होती. एनआयएने दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदच्या शाकिर बशीर मागरेला काश्मीरमधून ताब्यात घेतलं होतं. शाकिरने आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद डारला मदत केली होती. शाकिर पुलवामाच राहणार असून त्याचं फर्नीचरचं दुकान आहे.

आदिल अहमद डारने स्फोटकं असलेली कार सुरक्षा दलाच्या ताफ्यातील गाडीवर धडकवली होती. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. शाकिरने याबाबत सांगितलं की, त्याने आदिल अहमद डार आणि इतर एक सहकारी मोहम्मद उमर फारुकला 2018 च्या शेवटपासून फेब्रुवारीत झालेल्या हल्ल्यापर्यंत घरात ठेवलं होतं.

शाकिर बशीरने आयईडी तयार करण्यासही मदत केली होती. अटकेनंतर शाकिरला 15 दिवस एनआयएनं त्याला ताब्यात घेतलं होतं. दरम्यान,  हल्ल्याशी संबंधित त्याची चौकशी एनआयए करणार होती.

हे वाचा : सौंदर्याआड क्रूरता! TikTok VIDEO करून झाली स्टार आता हत्येच्या आरोपाखाली अटक

पुलवामात 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. दुपारी 3.30 च्या सुमारास आदिल अहमद डार एका कारमधून आला आणि त्यानं कार सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवली. त्यानंतर झालेल्या धडकेनंतर स्फोट झाला. यात जवांना घेऊन जाणारी बस उडाली आणि 40 जवान शहीद झाले होते.

हे वाचा : क्लास सुरू असलेल्या इमारतीला भीषण आग; सामान्यांतल्या हीरोंमुळे अलगद वाचले विद्यार्थी! पाहा VIDEO

First published: March 3, 2020, 10:08 PM IST
Tags: Pulwama

ताज्या बातम्या