जाहिरात
मराठी बातम्या / देश / सौंदर्याआड क्रूरता! TikTok VIDEO करून झाली स्टार आता हत्येच्या आरोपाखाली अटक

सौंदर्याआड क्रूरता! TikTok VIDEO करून झाली स्टार आता हत्येच्या आरोपाखाली अटक

सौंदर्याआड क्रूरता! TikTok VIDEO करून झाली स्टार आता हत्येच्या आरोपाखाली अटक

TikTok च्या नादात हत्येचा प्रयत्न करण्यापर्यंत तिची मजल गेली. पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 03 मार्च : सध्या टिकटॉकचं तरुणाईला इतकं वेड लागलं आहे की व्हिडिओसाठी काहीही करायला तयार होतात. अनेकजण सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करतात. यामुळे वादही झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता सूरतमधील टिकटॉक स्टार कीर्ती पटेलला पोलिसांनी अटक केली आहे. नेहमी वादात राहणाऱ्या किर्तीने व्हिडिओ शूट करण्याच्या वादातून मारहाण केल्याचा आरोप होता. पूनगाम पोलिसांनी मंगळवारी तिला ताब्यात घेतलं. याआधी बंदी असलेल्या प्राण्यांसोबत टिकटॉक व्हिडिओ केल्यानं वन विभागाने तिच्यावर कारवाई केली होती. किर्ती पटेलवर आरोप आहे की तिने काही दिवसांपूर्वी घोड्यावर बसून लग्न करण्याचा व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर तिने चॅलेंजही दिलं होतं. तेव्हा रघु भरवाड नावाच्या मुलाने हत्तीवरून बसून लग्न करण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. काही दिवसांपूर्वी किर्ती पटेल राघु भरवाडला भेटायला गेली होती. यावेळी किर्ती पटेलचा मित्र हनु भरवाडसुद्धा होता. पोलिसांनी सांगितलं की, दोघांमधील वादामुळे रघु भरवाडवर प्राणघातक हल्ला केला होता. हनु भरवाडच्या साथीने हा हल्ला केला. यामध्ये रघु भरवाड गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांत किर्ती पटेलविरुद्द तक्रार दाखल केली आहे. यानंतर किर्तीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिला अटक करण्यात आली आहे. लोकांनीही ती धमक्या देत असल्याचं म्हटलं आहे. हे वाचा : जीवघेणा खेळ, tik tok करताना शूट झाला तरुणाच्या मृत्यूचा थरारक LIVE VIDEO काही दिवसांपूर्वी किर्तीवर वन विभागानेही कारवाई केली होती. तिने घुबडाला घेऊन व्हिडिओ केला होता. घुबड हे गुजरात सरकारच्या सुरक्षित प्राण्यांच्या यादीत येतं. त्याच्यासोबत व्हिडिओ केल्यानं 15 हजार रुपयांचा दंड किर्तीला झाला होता. तर व्हिडिओ शूट करणाऱ्याला 10 हजार रुपये दंड केला होता. हे वाचा : TikTok वर मोजून दाखवली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची संपत्ती, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: tiktok
  • First Published :
जाहिरात
जाहिरात