जाहिरात
मराठी बातम्या / देश / किती सुंदर! घरातच अवतरला बगीचा; तब्बल 400 झाडांचं संगोपन

किती सुंदर! घरातच अवतरला बगीचा; तब्बल 400 झाडांचं संगोपन

त्यांचं घर म्हणजे एक हिरवीगार बागच दिसते.

त्यांचं घर म्हणजे एक हिरवीगार बागच दिसते.

संपूर्ण बगीचाच घरात आला तर? असा कधी विचार केलाय तुम्ही? मध्यप्रदेशच्या एका महिलेने हा विचार चक्क सत्यात उतरवलाय.

  • -MIN READ Local18 Damoh,Madhya Pradesh
  • Last Updated :

अर्पित बडकूल, प्रतिनिधी दमोह, 21 जून : अनेकजणांना झाडं लावण्याची, त्यांचं संगोपन करण्याची प्रचंड आवड असते. तर, काहीजणांना आपल्या अवतीभवती गर्द झाडी असावी, रंगीबेरंगी फुलं असावी, फळं असावी असं वाटतं. त्यामुळे ते बागेत जास्तीत जास्त वेळ घालवणं पसंत करतात. काहीजण तर आपलं घर झाडांनी सजवतात. मात्र संपूर्ण बगीचाच घरात आला तर? असा कधी विचार केलाय तुम्ही? मध्यप्रदेशच्या एका महिलेने हा विचार चक्क सत्यात उतरवलाय. बालपणापासून असलेलं झाडांवरचं प्रेम प्रियंका तिवारी यांनी लग्नानंतरही जपलं. मागील 4 वर्षांपासून त्यांनी पती आणि आपल्या मुलांच्या साथीने तब्बल 400 झाडं घरातच लावली. यात फुलझाडं, फळझाडं, शोभेची झाडं आणि औषधी वनस्पतींचा समावेश आहे.

News18लोकमत
News18लोकमत

तसं पाहिलं तर दमोह शहरातील श्रीवास्तव कॉलनीत राहणाऱ्या प्रियंका यांचं घर फार मोठं नाहीये. परंतु त्यांची झाडांप्रती जवळीक पाहून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना घर झाडांनी सजवण्यास मदत केली. आता त्यांचं घर म्हणजे एक हिरवीगार बागच दिसते. या सर्व झाडांची काळजी प्रियंका आणि त्यांचे कुटुंबीय घेतात. एखाद्या वेळी त्यांना कुठे बाहेर जायचं असेल, तर त्यांचे शेजारीदेखील आवडीने झाडांना पाणी देतात. Yoga Day 2023: 2 हार्ट अटॅक, 1 अँजिओप्लास्टी तरीही योगा आणि प्राणायाममुळे 63 वर्षांचे आजोबा तरुणासारखे फिट Video तब्बल 400 झाडांमुळे प्रियंका यांच्या कुटुंबियांना शुद्ध हवेत जगता येतंय. त्याचबरोबर हे घर संपूर्ण जिल्ह्यासाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. शिवाय आपलंही घर असंच बागेसारखं दिसावं यासाठी जिल्ह्यातील इतर लोकही प्रयत्न करू लागले आहेत. ही बाब पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात