मराठी बातम्या /बातम्या /मनी /Petrol Diesel Price : आता स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? गेल्या वीस दिवसांपासून स्थिर आहेत किमती

Petrol Diesel Price : आता स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? गेल्या वीस दिवसांपासून स्थिर आहेत किमती

Petrol

Petrol

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज (Petrol Diesel Price Today) सलग विसाव्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. या इंधनाचा GSTच्या कक्षेत समावेश झाल्यास किमतीमध्ये तब्बल 25 रुपयांची घट येईल, असं सीतारामण यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली 19 मार्च : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज (Petrol Diesel Price Today) सलग विसाव्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. यामुळे सामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. देशाच्या राजधानीसह सर्वच शहरांमध्ये दर स्थिर आहेत. याआधी मागील महिन्यात तब्बल चौदा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. यानंतर जवळपास सगळ्याच शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. इंधनाच्या या वाढत्या किमतींवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यासह पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही चिंता व्यक्त केली होती.

मागील आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावर एक पर्यायही सुचवला आहे. पेट्रोलियम प्रोडक्ट्स जीएसटीमध्ये आणायला हवे आणि याबद्दल GST काउन्सिलमध्ये चर्चा व्हायला हवी. असं झाल्यास किमतीमध्ये तब्बल 25 रुपयांची घट येईल, असं त्यांनी म्हटलं होतं.

स्वस्त होणार पेट्रोल डिझेल -

पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी सरकारने केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांना याचा फायदा होईल. याशिवाय दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन विधानसभेत म्हणाले, की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आधीच पेट्रोल - डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली आहे.

रोज सकाळी ६ वाजता बदलतात दर -

रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये (Petrol Diesel Price) बदल होत असतात. सकाळी ६ वाजतापासूनच नवीन दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडून किंमत जवळपास दुप्पट होते. विदेशी चलनासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतात.

असे तपासा पेट्रोल डिझेलचे दर -

तुम्ही SMS च्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तपासू शकता. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी ६ वाजता अपडेट होतात. इंडियन ऑईल वेबसाईटनुसार, तुम्हाला RSP सह आपल्या शहराचा कोड टाईप करून 9224992249 या नंबरवर SMS पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. हा आपण IOCLच्या वेबसाईटवर पाहू शकता. तर BPCL ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि HPCL ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

First published:

Tags: GST, Money, Nirmala Sitharaman, Petrol and diesel price, Petrol and Diesel price cut