Home /News /lifestyle /

FACT CHECK: गोमूत्र प्यायल्यानं आणि लसूण खाल्ल्यानं कोरोना बरा होतो?

FACT CHECK: गोमूत्र प्यायल्यानं आणि लसूण खाल्ल्यानं कोरोना बरा होतो?

गोमूत्र प्यायल्यानं आणि लसूण खाल्ल्यानं कोरोना बरा होतो असा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर अनेक जणांनी या संदर्भात दावा केला आहे.

    मुंबई, 24 मार्च : चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार पसरला आहे. यावर सध्यातरी कोणतं पूर्ण बरं होईल असं औषध अजून तरी निघालं नाही. यासंदर्भात अनेक संशोधनं सुरू आहेत. त्यातच आता आणखी एक दावा केल्याचं समोर आलं आहे. गोमूत्र प्यायल्यानं आणि लसूण खाल्ल्यानं कोरोना बरा होतो असा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर अनेक जणांनी या संदर्भात दावा केला आहे. गोमूत्र प्यायाल्यानं आणि लसूण आणि मीठ पाण्यात टाकून त्या पाण्यानं गुळण्या केल्यानं कोरोनाचा संसर्ग होत नाही असा दावा केला गेला आहे. या दाव्याची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न न्यूज 18 ने केला आहे. दावा- 1. उन्हाळा आल्यावर कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होईल सत्य- वैज्ञानिक आणि तज्ञांच्या मते, तापमानात वाढ झाल्याने कोरोनाच्या साथीचा परिणाम संपुष्टात येईल का हे आतापर्यंत निश्चितपणे सांगता येणार नाही. हे सौदी अरेबियाच्या उदाहरणावरून समजू शकते. सौदी अरेबियामध्ये अजूनही तापमान 30 अंशांच्या जवळ आहे, परंतु तरीही तेथे प्रादूर्भावाचं प्रमाण वाढत असल्याचं दिसत आहे. दावा- 02 - कोमत पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यानं संसर्ग होत नाही. सत्य- जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार असं अद्याप स्पष्ट झालं नाही की कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यानं संसर्ग होत नाही. उलट जास्त मीठ आपल्या शरीरात गेल्यानं धोका निर्माण होऊ शकतो. हे वाचा-CORONA VIRUS : संचारबंदीत गाडीमध्ये सेक्स करताना आढळले तरुण आणि महिला दावा 03- लसूणीमुळे कोरोनाचा परिणाम, संसर्ग संपुष्टात येतो. सत्य- या दाव्याला कोणताही पुरावा नाही. या उलट जास्त लसूण खाल्ल्यानं शरीराला हानिकारकच होते. पित्ताचा अति त्रास असणाऱ्यांनी कच्ची लसूण खाल्ल्यानंही त्रास होतो. दावा 04 - जास्त गरम पाण्यानं अंघोळ करा आणि तुळशीची पान खा. सत्य- हा दावा पूर्ण पणे चुकीचा आहे. गरम पाण्याने अंघोळ केल्यानं धूळ आणि साधे किटाणू मरतात मात्र कोरोनाचे विषाणू किंवा संसर्ग झालेले जंतू यामुळे मरत नाहीत. दावा- 05 गोमूत्र प्यायल्यानं कोरोनाचा संसर्ग होत नाही सत्य- गोमूत्रात औषधी गुण असतात याबाबत शंकाच नाही. परंतु अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही की गोमूत्र पिणे किंवा गोबर गंध लागल्यास संसर्ग होणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावरून येणारे मेसेज किंवा फिरणाऱ्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. येणाऱ्या प्रत्येक मेसेजची सत्यता पडताळून पाहा आणि तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या असं न्यूज 18 लोमकत आपल्याला आवाहन करत आहे. हे वाचा-कहर! लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांचा पोलिसांनी केला 'मुर्गा', VIDEO VIRAL
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या