• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Purvanchal Expressway : उत्तर प्रदेशातील अनेक मोठ्या शहरांना जोडणाऱ्या पूर्वांचल एक्सप्रेसवेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

Purvanchal Expressway : उत्तर प्रदेशातील अनेक मोठ्या शहरांना जोडणाऱ्या पूर्वांचल एक्सप्रेसवेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूर्वांचल एक्सप्रेसवेचं उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूर्वांचल एक्सप्रेसवेचं उद्घाटन

Purvanchal Expressway : पूर्वांचल एक्सप्रेसवे हा उत्तर प्रदेशातील वाराणसी, अयोध्या, गोरखपूर आणि इलाहबाद सारख्या मोठ्या प्रमुख शहरांशी जोडला गेला आहे. त्यामुळे पर्यटनासह अनेक गोष्टींसाठी याचा फायदा होणार आहे.

 • Share this:
  लखनऊ, 16 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 340 किमी अंतराच्या पूर्वांचल एक्सप्रेसवेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या एक्सप्रेसवेने उत्तर प्रदेशातील अनेक मोठी शहरं थेट राजधानी लखनऊशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे भाजपच्या अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी पूर्वांचल एक्सप्रेसवेचा प्रकल्प होता. हा प्रकल्प अखेर पूर्णत्वास आला असून एक्सप्रेसवेचं उद्घाटन देखील झालं आहे. उत्तर प्रदेश सरकारने या उद्घाटनासाठी जंगी तयारी केली होती. उद्घाटनानंतर हवाई दलाकडून 45 मिनिटांचा एअर शो सुद्धा आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाच्या उद्घाटनस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय हवाई दलाच्या C130J या सुपर हरक्यूलस विमानातून दाखल झाले होते. पूर्वांचल एक्सप्रेसचा उपयोग भारतीय वायूसेनेच्या विमानांच्या आपातकालीन लॅंडिंग आणि टेकऑफसाठी होणार आहे.

  एक्सप्रेसवेचा तीर्थयात्रेसाठी भरपूर फायदा होणार

  पूर्वांचल एक्सप्रेसवे हा उत्तर प्रदेशातील वाराणसी, अयोध्या, गोरखपूर आणि इलाहबाद सारख्या मोठ्या प्रमुख शहरांशी जोडला गेला आहे. त्यामुळे पर्यटनासह अनेक गोष्टींसाठी याचा फायदा होणार आहे. हा एक्सप्रेसवे 340.8 किमी इतक्या अंतराचा असून तो उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ पासून सुरु होतो. हा एक्सप्रेसवे इतका मोठा आहे की तो लखनऊ पासून सुरु होऊन युपीच्या पूर्वेकडली गाझीपूर येथे संपतो. या एक्सप्रेसवेचा तीर्थयात्रेसाठी भरपूर फायदा होणार आहे. हेही वाचा : नवाब मलिकांनी 'ते' WhatsApp चॅट केलं उघड, समीर वानखेडेंवर केला नवा आरोप

  पूर्वांचल एक्सप्रेसवेचे दहा प्रमुख वैशिष्ट्ये :

  1) हा एक्सप्रेसवे सहा लेनचा आहे. पण पुढे तो आठ लेनपर्यंत वाढवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा एक्सप्रेसवे लखनऊला आजमगढ, मऊ, गाझीपूर, फैजाबाद, सुल्तानपूर, आंबेडकर नगर आणि अमेठी सारख्या शहरांना जोडतो. 2) पूर्वांचल एक्सप्रेसवे लखनऊच्या चांद सराय गावापासून सुरु होतो आणि गाझीपूर जिल्ह्याच्या हैदरिया गावात संपतो. विशेष म्हणजे हा एक्सप्रेसवे यमुना एक्सप्रेसवेद्वारे उत्तर प्रदेशच्या पूर्वेतील जिल्ह्यांना थेट देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीला जोडणार आहे. त्यामुळे हा देशातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे ठरणार असल्याचं बोललं जातंय. 3) एक्सप्रेसवे दरम्यान आठ पेट्रोलपंप आहेत. त्यामध्ये चार सीएनजीची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. 4) सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचा देखील विचार करण्यात आलाय. एक्सप्रेसवे दरम्यान 4 लाख झाडं लावण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येकी 500 मीटरच्या अंतरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग पिट्स बनवले जात आहेत. यासोबतच एक्सप्रेसवेवर इंटरचेंज, फ्लायओव्हर, लहान-मोठे पूल, सोलार बॅकअपची देखील व्यवस्था केली जात आहे. हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव, दुसऱ्यादिवशी Covid बाधिताची नोंद 5) दुर्घटना किंवा आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लाईफ सपोर्ट सिस्टम असलेल्या रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच 20 पेट्रोलिंग वाहने देखील तैनातय करण्यात येतील, अशी देखील चर्चा आहे. 6) रस्ता सुरक्षा उपाययोजनांसाठी दोन लेनच्या मध्यभागी मेटल बीम क्रॅश बॅरिअर, माहिती दर्शक फलंक देखील असतील. 7) उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाने (UPEIDA) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक्सप्रेसवर व्यापक सुरक्षेची व्यवस्था केली आहे. यामध्ये अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा आणि भटकी जनावरे रोखण्यासाठी कुंपण घालण्यात येणार आहे. 8) कोरोना संकट असतानाही सरकारने ऑक्टोबर 2021 पर्यंत काम पूर्ण करण्याचे ध्येय वास्तव्यात साकारले आहे. 9) भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी आपत्कालीन धावपट्टी म्हणूनही एक्सप्रेसवेचा वापर केला जाणार आहे. 10) एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत या मार्गाने दररोज 15 ते 20 हजार वाहने त्याचा वापर करतील, अशी उत्तर प्रदेश सरकारला आशा आहे.
  Published by:Chetan Patil
  First published: