मुंबई, 16 नोव्हेंबर : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन (Mumbai Cruise drug case) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबी आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिकांनी म्हटलं, के पी गोसावी आणि मनिष भानुशाली हे मुख्य भूमिकेत होते. दिल्लीतून ज्या खबऱ्याने काही फोटोज, काही नावं पाठवले होते त्यात काशिफ खान याचंही वाव होतं. काशिफ खान याचा फोटोही के पी गोसावीला शेअर केला होता. काशिफ कान हा क्रूझवर गेला होता आणि त्याच्यासोबत दुबईतील एक व्यक्ती होता मात्र, समीर वानखेडेंनी त्यांना ताब्यात घेतले नाही. गोसावी त्याला सांगताय फोटो पाठवा काशीफ खानचा फोटो पाठवण्यात आला आणि या पद्धतीने फोटोच्या आधारावर लोकांना ओळख करून ताब्यात घेण्यात आलं. या पद्धतीने काशिफला का ताब्यात घेतलं नाही? त्यालाच का सूट देण्यात आली? तो क्रूज वर दोन दिवस काय करत होता? इतके दिवस करवाई का केली नाही.
Here are whatsapp chats between K P Gosavi and an informer which shows how they were planning to trap people who were going to attend the party on the Cordelia Cruise.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
This is Sameer Dawood Wankhede's private army therefore he has a lot to answer pic.twitter.com/Et6VNrQefR
जर माहितीच्या आधारे वानखेडेंनी कारवाई केली होती तर काशिफ खान याला का ताब्यात घेतले नव्हते. काशिफ खान याचा फोटो के पी गोसावीला पाठवला होता. वानखेडेंनी काशिफ खान याला क्रूझवर जाण्यास परवानगी दिली. दोन दिवस सर्सार ड्रग्ज पार्टी चालली. त्यानंतर काशिफ खान आणि व्हाईट दुबई यांना सुरक्षित बाहेर काढलं असंही नवाब मलिक म्हणाले.
Here is a whatsapp chat between K P Gosavi and an informer which mentions Kashiff Khan.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
Why is Kashiff Khan not being questioned ?
What is the relationship between Kashiff Khan and Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/yVjW2LtUWh
नवाब मलिक पुढे म्हणाले, आज मी ट्विटरवर फोटोज अपलोड करुन प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीतील खबरीचं व्हॉट्सअॅप चॅट मी पोस्ट केलं आहे. के. पी गोसावी त्यावर लिहिलेलं आहे. काहीजण त्या ट्विटवर प्रश्न उपस्थित करतील सुद्धा. काशिफ खान यांच्यासोबत समीर वानखेडे यांचे काय संबंध आहेत. काशिफ खान याला ताब्यात का नाही घेतलं. काशिफ खान क्रूझवर पोहोचला? गोव्यात काशिफ खान बसलेला असताना त्याला का नाही बोलावलं? गोव्यात ड्रग्ज प्रकरणात छापेमारी का नाही होत? काशिफ खान हा वानखेडेंचा कलेक्टर आहे. प्रायव्हेट आर्मीचा मेंमर आहे. गोव्यातील संपूर्ण खेळ हा काशिफ खान याच्या माध्यमातून केला जात आहे. आम्हाला वाटतंय की, वानखेडेंनी जाहीर करावं की काशिफ खानला का वाचवलं जात आहे. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काशिफ खान याला बोलवावं आणि चौकशी करुन कारवाई करावी. एक खतरनाक व्यक्ती ज्याच्यावर देशातील विविध प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीला का वाचवत आहेत त्याचं उत्तर समीर वानखेडे यांना द्यावे लागणार असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.