मराठी बातम्या /बातम्या /देश /राष्ट्रपतिपदाची निवडणूक: पवारांचं मन वळवण्याचे जोरदार प्रयत्न, विरोधी पक्षांची आज दिल्लीत बैठक

राष्ट्रपतिपदाची निवडणूक: पवारांचं मन वळवण्याचे जोरदार प्रयत्न, विरोधी पक्षांची आज दिल्लीत बैठक

Presidential Election: विरोधी पक्षांची (Opposition parties) आज दिल्लीत बैठक होत आहे.

Presidential Election: विरोधी पक्षांची (Opposition parties) आज दिल्लीत बैठक होत आहे.

Presidential Election: विरोधी पक्षांची (Opposition parties) आज दिल्लीत बैठक होत आहे.

नवी दिल्ली, 15 जून: विरोधी पक्षांची (Opposition parties) आज दिल्लीत बैठक होत आहे. राष्ट्रपती निवडणुकीबाबत आज रणनीती ठरणार आहे. सध्या आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्ष अशा चेहऱ्याच्या शोधात आहेत ज्यावर सर्व विरोधी पक्षांचे एकमत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सर्वात योग्य मानले जात होतं, मात्र त्यांना संयुक्त विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यात रस नाही. मात्र त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर डाव्या नेत्यांनीही पवारांची भेट घेतली. येत्या बुधवारी, ममता बॅनर्जी यांच्या आवाहनानुसार, संभाव्य उमेदवारावर चर्चा करण्यासाठी विरोधकांची बैठक होणार आहे. त्यात सर्व पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. इकडे पवारांनी नकार दिल्यानंतर आता विरोधक इतर नेत्यांच्या नावाचाही विचार करत आहेत. संभाव्य पर्याय म्हणून काही नेत्यांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्याशीही संपर्क साधला आहे.

पुन्हा चकमक, पुन्हा दहशतवादी ठार..!, लष्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

यावेळी भाजपच्या विरोधात मजबूत संयुक्त उमेदवार उभे करण्याच्या कसरतीत विरोधक व्यस्त आहेत. आतापर्यंत या शर्यतीत शरद पवारांचे नाव आघाडीवर होते. त्यांच्या उमेदवारीला अनेक लहान-मोठ्या पक्षांनी पाठिंबा दिल्याचे वृत्त समोर आले होते. पण खुद्द शरद पवार ही निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाहीत.

राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळ सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत पवार म्हणाले होते की, "मी शर्यतीत नाही, मी राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाची उमेदवार असणार नाही." यानंतर तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटून मन वळवण्याचा प्रयत्न केला. यानंतर डावे नेते सीताराम येचुरी आणि डी. राजा यांनीही पवारांची भेट घेतली.

बैठकीनंतर डी. राजा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, त्यांनी (पवार) आम्हाला सांगितलं की त्यांना निवडणूक लढवण्यात रस नाही. बुधवारी होणाऱ्या बैठकीत ते मनमोकळेपणाने बोलणार आहेत. आम्हाला इतर उमेदवारांच्या शक्यतांचा शोध घ्यावा लागेल. देशातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी पक्ष आणि शक्तींची एकजूट महत्त्वाची असल्याने आपण बुधवारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं पवार यांनी डाव्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं.

निवडणुकीआधी सेनेला ED चा धक्का! आता प्रियंका गांधींचा नंबर? या जिल्ह्यात Monsoon अलर्ट TOP बातम्या

ममता बॅनर्जी यांच्या आवाहनानुसार होणाऱ्या या बैठकीला सर्व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. याआधी काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते ममता यांच्या या एकतर्फी उपक्रमाच्या बाजूने नव्हते. पण ते एकत्र विरोधी पक्षाचा संदेश देण्यासाठी या बैठकीत सहभागी होतील, असे सांगण्यात येते.

एक्सप्रेसने टीएमसीच्या सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, काँग्रेस, समाजवादी पक्ष, आरजेडी, सीपीआय(एम), सीपीआय, एनसीपी, शिवसेना आणि डीएमके यांनी बुधवारच्या बैठकीत त्यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला बैठकीला येऊ शकतात. मात्र आम आदमी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

इकडे शरद पवारांची नाखुशी पाहता विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी अन्य नावांची चाचपणी सुरू केली आहे. वृत्तसंस्था भाषाने सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, काही नेत्यांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्याशी संपर्क साधला आहे. 2017 मध्ये उपराष्ट्रपतिपदासाठी गांधी हे विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार होते. व्यंकय्या नायडू यांच्याकडून निवडणूक हरली असली तरी.

Yoga Day 2022: मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी Yoga कराच; पण आसनं करताना घ्या ही काळजी 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांनी बुधवारपर्यंत वेळ मागितली असली तरी त्यांनी सुरुवातीची प्रतिक्रिया सकारात्मक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

First published:
top videos

    Tags: Mamta Banerjee, NCP, Sharad Pawar (Politician)