मराठी बातम्या /बातम्या /देश /

Presidential Election 2022: राष्ट्रपती हवा असेल तर पवारांसारख्या नेत्यांचा विचार करावा लागेल - संजय राऊत

Presidential Election 2022: राष्ट्रपती हवा असेल तर पवारांसारख्या नेत्यांचा विचार करावा लागेल - संजय राऊत

Presidential Election : "राष्ट्रपती हवा असेल तर...." शिवसेना नेते संजय राऊत यांचं मोठं विधान

Presidential Election : "राष्ट्रपती हवा असेल तर...." शिवसेना नेते संजय राऊत यांचं मोठं विधान

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी संदर्भात विरोधी पक्षातील नेत्यांची दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे.

  • Published by:  Sunil Desale
अयोध्या, 15 जून : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election 2022) संभाव्य उमेदवारावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक (opposition party leaders meeting) होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सर्वात योग्य मानले जात होतं, मात्र त्यांना संयुक्त विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यात रस नाही. मात्र त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मोठं विधान केलं आहे. संजय राऊत म्हणाले, राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भातील बैठकीत आम्ही सर्वच सहभागी होणार होतो. पण आमचा अयोध्या दौरा हा पूर्वनियोजित होता. असं असलं तरी आमचा एक प्रतिनिधी त्या बैठकीत उपस्थित असेल. देशभरातील प्रमुख नेत्यांसोबत आमचा संवाद सुरू आहे. ममता बॅनर्जी यांच्या उपस्थित जी बैठक होत आहे ती नक्कीच यशस्वी होईल. त्यातून देशातील विरोधी पक्षाची चांगली आघाडी निर्माण होण्याचं हे पहिलं पाऊल आहे. वाचा : राष्ट्रपतीपदाची निवडणूक: पवारांचं मन वळवण्याचे जोरदार प्रयत्न, विरोधी पक्षांची आज दिल्लीत बैठक या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. खरं तर ही बैठक मुंबईत घेण्याचं आधी ठरलं होतं. पण निवडणुकीच्या प्रक्रियेत आम्हाला पुढाकार घेता आला नाही. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहिले असते. आम्ही अयोध्येला असल्यामुळे या बैठकीत जाऊ शकत नाही पण आमच्याकडून कुणीतरी उपस्थित राहील असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी पुढे म्हटलं, शरद पवार हे इतके मोठे नेते आहेत. या देशाला राष्ट्रपती हवाय की रबर स्टॅम्प हे ठरवण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला राष्ट्रपती हवा असेल तर शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा विचार करायला हवा. जर तुनम्हाल रबर स्टॅम्प हवा असेल तर मग फार नेत्यांची रांग दिल्लीत लागली आहे. वाचा : आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध; हनुमानगढीच्या महंतांनी म्हटलं, "येताय तर भक्त म्हणून या पण..." माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस पक्षालाही आमंत्रण देण्यात आलं आहे. पण काँग्रेस पक्ष सध्या पूर्णपणे राहुल गांधी यांच्या संदर्भात जे सुरू आहे, दिल्लीत आंदोलन सुरू आहे त्यात अडकलं आहे असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेनेकडून सुभाष देसाई दिल्लीत राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये शिवसेना सहभागी होत आहे. शिवसेनेच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई या बैठकीत सहभागी होणार आहेत. नवी दिल्ली येथे दुपारी तीनच्या सुमारास कॉन्स्टिट्युशन क्लब येथे ही बैठक होणार आहे. यासाठी शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून सुभाष देसाई नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.
First published:

Tags: India, President, Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या