मराठी बातम्या /बातम्या /देश /डॉक्टरांवर सामूहिक अत्याचाराचा आरोप, मृत्यूपूर्वी पीडितेनं चिठ्ठी लिहून दिली माहिती

डॉक्टरांवर सामूहिक अत्याचाराचा आरोप, मृत्यूपूर्वी पीडितेनं चिठ्ठी लिहून दिली माहिती

Prayagraj crime news - पोलिसांच्या मते, ही तरुणी तहानलेली होती. डॉक्टरांनी तिला पाणी द्यायला नकार दिला. त्यामुळं तिला राग आलेला होता. तिच्या मानसिक स्थितीमुळं तिनं असं लिहिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Prayagraj crime news - पोलिसांच्या मते, ही तरुणी तहानलेली होती. डॉक्टरांनी तिला पाणी द्यायला नकार दिला. त्यामुळं तिला राग आलेला होता. तिच्या मानसिक स्थितीमुळं तिनं असं लिहिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Prayagraj crime news - पोलिसांच्या मते, ही तरुणी तहानलेली होती. डॉक्टरांनी तिला पाणी द्यायला नकार दिला. त्यामुळं तिला राग आलेला होता. तिच्या मानसिक स्थितीमुळं तिनं असं लिहिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

प्रयागराज, 8 जून : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) संतापजनक असा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मिर्झापूरच्या (Mirzapur) एका तरुणीचा मृत्यू झाला. पण दुर्दैवी बाब म्हणजे तरुणीनं मृत्यूपूर्वी रुग्णालय प्रशासन (Hospital Administration) आणि डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ऑपरेशन थिएटरमध्ये या तरुणीबरोबर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर या तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी एसआरएन रुग्णालयातील डॉक्टरांच्या चौकशीसाठी (Doctors inquiry) दोन चौकशी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

(वाचा-कैऱ्या तोडल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला मारहाण, VIDEO व्हायरल)

मिर्झापूर येथील एका तरुणानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाने एसआरएन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहे. या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार त्यानं 29 मे रोजी त्याच्या बहिणीला आतड्यांसंबंधी उपचारांसाठी एसआरएन रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर 1 जूनच्या रात्री डॉक्टरांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. काही वेळानं तरुणीला बाहेर आणण्यात आलं त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती. मात्र ती सारखं काही तरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, मात्र पूर्ण शुद्धीत नसल्यानं तिला बोलता येत नव्हतं.

(वाचा-दिवसा डब्बेवाला अन् रात्री दरोडेखोर; पुणे पोलिसांनी सराईताच्या आवळल्या मुसक्या)

त्यानंतर तिला लिहून सांगता यावं म्हणून एक पेन आणि पेपर दिला. त्यावर तिनं लिहून जेकाही सांगितलं ते अत्यंत गंभीर होतं. तरुणीनं पेपरवर लिहिलं की, डॉक्टर चांगले नाहीत, मला काहीही ट्रिटमेंट दिली नाही आणि माझ्याबरोबर वाईट कृत्य केलं. तरुणी हे लिहित होती, तेव्हा तिच्या भावानं त्याचा व्हिडिओ तयार करत तो व्हायरल केला.

दरम्यान, पोलिसांची या प्रकरणात एक नवी कथा समोर येत आहे. पोलिसांच्या मते, ही तरुणी तहानलेली होती. डॉक्टरांनी तिला पाणी द्यायला नकार दिला. त्यामुळं तिला राग आलेला होता. त्यानंतर तिची अवस्था अधिक गंभीर झाली होती. तिच्या मानसिक स्थितीमुळं तिनं असं लिहिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांवर करण्यात आलेल्या सामुहिक अत्याचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी या प्रकरणात दोन चौकशी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. रुग्णालय आणि प्रयागराज येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी दोघांनी समित्यांची स्थापना केली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Gang Rape, Up crime news, Uttar pradesh news