Home /News /maharashtra /

कैऱ्या तोडल्याच्या रागातून मुलाला झाडाला बांधले; अंगावर लघुशंका करत मारहाण, जळगावातील VIDEO VIRAL

कैऱ्या तोडल्याच्या रागातून मुलाला झाडाला बांधले; अंगावर लघुशंका करत मारहाण, जळगावातील VIDEO VIRAL

Minor child beaten: झाडावरील कैऱ्या तोडल्या म्हणून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जळगाव, 8 जून: जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) भडगाव तालुक्यात असलेल्या अंजनविहिरे (Anjanvihire) येथे एक संतापजनक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलाने झाडावरील कैऱ्या तोडल्याच्या रागातून त्याला झाडाला बांधण्यात आले. इतकेच नाहीतर त्याला बेदम मारहाण (tied to tree and beaten) करुन त्याच्या अंगावर लघुशंका करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोपी पीडित मुलाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अंजनविहिरे येथे शेतातील कैर्‍या तोडल्याच्या कारणावरून शेतमालकासह रखवालदाराने एका अल्पवयीन मुलाला दोन तास झाडाला बांधून ठेवले. या मुलाचा मोबाइलमध्ये व्हिडीओ काढून तो व्हाट्सअपवर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी शेतमालक गोपी उर्फ विवेक रवींद्र पाटील आणि रखवालदार प्रवीण पावर्‍या (दोघे रा.अंजनविहिरे, ता.भडगाव) यांना अटक केली आहे. दिवसा डब्बेवाला अन् रात्री दरोडेखोर; पुणे पोलिसांनी सराईताच्या आवळल्या मुसक्या पीडित अल्पवयीन मुलगा 12 वीच्या शिक्षणासाठी अंजनविहिरे येथे मामांकडे आला होता. 5 जून रोजी तो त्याच्या आजीची औषधी घेऊन गिरड गावातून घरी परत जात असताना त्याने गोपी पाटील याच्या शेतातील झाडाच्या कैर्‍या तोडल्या. झाडाच्या कैऱ्या तोडल्यानंतर रखवालदाराने जाब विचारत शेत मालकाला घटना सांगितली. त्यानंतर दोघांनी मुलाला मारहाण करीत दोराच्या सहाय्याने चिकूच्या झाडाला बांधले आणि त्याबाबतचा व्हिडीओ व्हॉट्सअपवर व्हायरल केला. पीडित मुलाने घडलेला प्रकार मामा आणि आजीला सांगितल्यानंतर दुसर्‍या दिवशी 6 जूनला याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रासिटी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Jalgaon, Maharashtra, Shocking news

    पुढील बातम्या