नवी दिल्ली 25 जानेवारी : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी सोमवारी सांगितलं की त्यांना 2024 मध्ये भाजपला (BJP in 2024) पराभूत करू शकेल अशी विरोधी आघाडी तयार करण्यात मदत करायची आहे आणि ते “पूर्णपणे शक्य आहे”. विविध पक्षांमध्ये ‘थोडं सामंजस्य’ आणि नवीन राष्ट्रीय पक्षाऐवजी ‘थोडासा बदल’ यावर भर देत प्रशांत किशोर म्हणाले, “2024 मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे का? याचं उत्तर एक जोरदार हो आहे. मात्र नेते आणि पक्षांच्या सध्याच्या परिस्थितीत ते शक्य आहे का? तर याचं उत्तर कदाचित नाही असं आहे.”
Punjab Election 2022: भाजपने जाहीर केला सीट शेअरिंग फॉर्म्युला
NDTV ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, काँग्रेस किंवा तृणमूल किंवा इतर कोणत्याही पक्षाने एकत्र येत स्वतःची पुनर्रचना केली आणि आपली संसाधने आणि रणनीती पुन्हा सुरू केली आणि म्हटलं की त्यांना 200 पैकी 100 जागा मिळतील. तर विरोधी पक्ष लोकसभेच्या सध्याच्या संख्याबळासह 250-260 जागांपर्यंत पोहोचू शकतात. पुढे ते म्हणाले, याचप्रकारे उत्तर आणि पश्चिममध्येही 100 आणखी जागा जिंकून भाजपला हरवणं शक्य आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या अखेरच्या लक्ष्याचा खुलासा करत म्हटलं, की एक विरोधी पक्षाचा मोर्चा बनवण्यासाठी मला मदत करायची आहे. जेणेकरून 2024 साली भाजपला जोरदार टक्कर देता येईल. ते म्हणाले, की भाजपने हिंदुत्व, “अति-राष्ट्रवाद” आणि लोककल्याण यांची सांगड घालून एक अतिशय “भयंकर कथा” मांडली आहे आणि विरोधी पक्षांना यापैकी किमान दोन मुद्द्यांमध्ये त्यांना मागे पाडून तसंच महागठबंधन करण्यासोबतच इतरही बरेच प्रयत्न करावे लागतील.
समाजवादी पक्षाला मिळाला भारतातील सर्वात ‘उंच नेता’; जाणून घ्या किती आहे Height
प्रशांत किशोर म्हणाले, की बिहारमध्ये 2015 नंतर एकही महागठबंधन यशस्वी ठरलं नाही. केवळ पक्ष आणि नेत्यांचं एकत्र येणंच पुरेसं नसेल. भाजपला पराभूत करण्यासाठी भावनिक आणि सुसंगत संघटनेची गरज आहे