Home /News /national /

Punjab Election 2022: भाजपने जाहीर केला सीट शेअरिंग फॉर्म्युला; कोण किती जागांवर लढणार वाचा सविस्तर

Punjab Election 2022: भाजपने जाहीर केला सीट शेअरिंग फॉर्म्युला; कोण किती जागांवर लढणार वाचा सविस्तर

पंजाब निवडणुकीत भाजप अमरिंदर सिंह आणि अकाली दलासोबत निवडणुकीच्या मैदानात उतरला असून जागावाटपाचं सूत्रदेखील जाहीर करण्यात आलं आहे.

    चंदिगढ, 24 जानेवारी: पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Elections) भाजप, (BJP) अमरिंदर सिंह (Amarinder Singh) आणि अकाली दलानं (Akali Dal) युतीची (Alliance) घोषणा केली असून कोण किती जागा लढवणार याचा फैसला जाहीर केला आहे. या निवडणुकीत भाजप 65 जागा, कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पंजाब लोक काँग्रेस 37 जागा तर संयुक्त अकाली दल 15 जागा लढवेल, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला टक्कर देण्यासाठी तिघांच्या युतीची घोषणा करण्यात आली असून पंजाबमध्ये मूलभूत बदल करण्याची योजना असल्याचा दावा नड्डा यांनी केला आहे.  सीमेवरील राज्याचा मुद्दा पंजाब हे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील राज्य असल्याचा मुद्दा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उपस्थित केला आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून त्यासाठी पंजाबमध्ये मजबूत आणि स्थिर सरकार असण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पंजाबमध्ये गेल्या काही वर्षांपासून ड्रग्ज तस्करीचंही प्रमाण वाढलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पंजाबमधील तरुणाई त्यामुळे व्यसनांच्या विळख्यात सापडली असून पंजाबला व्यसनमुक्त आणि सुरक्षित राज्य बनवण्याच्या दिशेनं ही युती पावलं टाकेल, असं आश्वासन नड्डा यांनी दिलं आहे.  हे वाचा - मोदींचा डंका देशभर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वाचा डंका वाजत असल्याचा दावा भाजपनं केला. देशाला ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी विकासाच्या मार्गावर घेऊन गेले, त्याप्रमाणंच पंजाबचाही विकास करण्याचं उद्दिष्ट आहे, असा दावा भाजपने केला आहे. ही निवडणूक केवळ सत्तापालट करण्याच्या हेतूने भाजप लढवत नसून पंजाबमध्ये काही मूलभूत बदल होण्याचं स्वप्न बाळगून आम्ही मैदानात उतरत आहोत, असं भाजपनं म्हटलं आहे. पंजाब हे देशाचं गोदाम असून देशाला खाद्यसुरक्षा पुरवण्याचं काम पंजाबनं केलं आहे. मात्र या पंजाबमधून माफियाराज संपवण्याचा आमचा हेतू आहे, असा दावा नड्डा यांनी केला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Assembly Election 2021, BJP, Congress, Punjab

    पुढील बातम्या