समाजवादी पक्षाला मिळाला भारतातील सर्वात 'उंच नेता'; जाणून घ्या किती आहे Height
समाजवादी पक्षाला मिळाला भारतातील सर्वात 'उंच नेता'; जाणून घ्या किती आहे Height
उत्तर प्रदेशचे अध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी धर्मेंद्र प्रताप सिंह यांना पक्षात समाविष्ट करताना त्यांच्या येण्याने समाजवादी पक्ष मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
लखनऊ 23 जानेवारी : यूपी विधानसभा निवडणुकीच्या काळात कोणत्याही पक्षाला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्याची एकही संधी सोडायची नाही. शनिवारी असंच काहीसं घडलं, जेव्हा देशातील सर्वात उंच व्यक्तीने (Tallest Man of India) समाजवादी पक्षात प्रवेश केला (Dharmendra Pratap Singh Joined Samajwadi Party). यावेळी स्वतः माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे धर्मेंद्र प्रताप सिंह यांच्यासोबत दिसले. समाजवादी पक्षाने एका निवेदनात म्हटलं आहे की, आज प्रतापगडचे धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी पक्षाच्या धोरणांवर आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत समाजवादी पक्षात प्रवेश केला.
उत्तर प्रदेशचे अध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी धर्मेंद्र प्रताप सिंह यांना पक्षात समाविष्ट करताना त्यांच्या येण्याने समाजवादी पक्ष मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. धर्मेंद्र प्रताप सिंह हे 46 वर्षांचे असून भारतातील सर्वात उंच व्यक्ती आहेत. त्यांची उंची 8 फूट 1 इंच आहे.
धर्मेंद्र प्रताप यांची उंची 2.4 मीटर म्हणजेच 8 फूट 1 इंच आहे आणि ते जगातील सर्वात उंच व्यक्तीपेक्षा केवळ 11 सेमी लहान आहेत. धर्मेंद्र प्रताप हे उत्तर प्रदेशातील मेरठचे रहिवासी आहेत. मात्र त्यांची हीच लांबी त्यांच्यासाठी चिंतेचा विषयही ठरते. धर्मेंद्र प्रताप यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, यामुळे त्यांना नोकरी किंवा आपल्या आयुष्याचा जोडीदार शोधण्यातही अडचणी येत आहेत.
या कारणास्तव त्यांनी मनोरंजन पार्कमध्ये कलाकार म्हणून काम केलं आहे. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोक 10 रुपयेही देतात. त्यांना चालण्यासही त्रास होत असून अनेकवेळा ते अपघाताला बळी पडले आहेत. धर्मेंद्र प्रताप सिंह यांच्या कुटुंबात त्यांचे आजोबा वगळता फारसे उंच लोक नाहीत. त्यांच्या आजोबांची उंची 7 फूट 3 इंच आहे. त्यांच्या लांबीमुळे लोक त्यांना जिराफ आणि उंटदेखील म्हणतात.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अखिलेश यादव हे धर्मेंद्र प्रताप सिंह आणि इतर नेत्यांसोबत दिसत आहेत. या सगळ्यांच्या मध्ये उभा असलेले धर्मेंद्र प्रताप आापल्या उंचीमुळे अगदी उठून दिसत आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.