Home /News /national /

Sri lanka Crises: श्रीलंकेसारखी भीषण स्थिती भारतातही निर्माण होऊ शकते, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

Sri lanka Crises: श्रीलंकेसारखी भीषण स्थिती भारतातही निर्माण होऊ शकते, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे चार तास चाललेल्या बैठकीत काही सचिवांनी याबाबत आपलं मत मांडलं. काही राज्य सरकारांच्या लोकप्रिय घोषणा आणि योजना जास्त काळ चालू ठेवता येणार नाहीत. हे थांबवले नाही तर राज्याची आर्थिक स्थिती खालावेल.

पुढे वाचा ...
  मुंबई, 4 एप्रिल : राजकीय पक्ष निवडणुकीत मतदारांना आकर्षित (Populist schemes) करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरतात. सध्या मतदारांना सर्व काही फुकट देण्याची स्पर्धा राजकीय पक्षांमध्ये लागली आहे. मात्र यामुळे देशातील अनेक राज्ये देशोधडीला लागतील. हे कुठेतरी थांबवली पाहिजे नाहीतर स्थिती श्रीलंका (Sri Lanka Crises) सारखी होईल, असा इशारा देशातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ही चिंता व्यक्त केली. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे चार तास चाललेल्या बैठकीत काही सचिवांनी याबाबत आपलं मत मांडलं. काही राज्य सरकारांच्या लोकप्रिय घोषणा आणि योजना जास्त काळ चालू ठेवता येणार नाहीत. हे थांबवले नाही तर राज्याची आर्थिक स्थिती खालावेल. लोकप्रिय घोषणा आणि राज्यांची आर्थिक स्थिती यांच्यात समतोल साधण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं. तुटला होता रुळ... पण वृद्ध महिलेने आपल्या लाल साडीने Alert देत वाचवला हजारो प्रवाशांचा जीव बैठकीत उपस्थित सचिव पदाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रात येण्यापूर्वी राज्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते म्हणतात की अनेक राज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि जर ते भारतीय संघराज्याचा भाग नसते तर ते आतापर्यंत गरीब झाले असते. राज्यांच्या सरकारांनी केलेल्या लोकप्रिय घोषणा जास्त काळ चालू ठेवता येणार नाहीत. त्या संपुष्टात आणणे गरजेचं आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर बोजा पडत आहे. आरोग्य आणि शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांसाठी निधीची कमतरता निर्माण होत आहे. गोरखनाथ मंदिरातल्या हल्ल्याचा Live Video Viral, अशा आवळल्या आरोपीच्या मुसक्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंजाब, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या सरकारांनी केलेल्या घोषणा जास्त काळ सुरु ठेवता येणार नाहीत. भाजपने देखील उत्तर प्रदेश आणि गोव्यात मतदारांना मोफत एलपीजी कनेक्शन आणि इतर सुविधा देण्याचे आश्वासन दिले, याचाही उल्लेख अधिकाऱ्यांनी केला. श्रीलंकेत सध्याची स्थिती 
  श्रीलंका सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. इंधन, स्वयंपाकाच्या गॅससाठी लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी आहे. तसेच अनेक आठवडे वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. जीवनाश्यक वस्तूच्या किमती गगनाला भिडल्या आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बटाटे 200 रुपये किलो, अंडी 360 रुपये डझन, मिरची 700 रुपये किलो यावरुन तुम्हाला तेथील परिस्थितीचा अंदाज लावता येऊल शकतो.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: India, Pm modi, Sri lanka

  पुढील बातम्या