कुसबा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास एटा-जलेसर-तुंडला पॅसेंजर ट्रेन इटाहून तुंडलाकडे जात होती. कुसबा गावात रूळ तुटला होता. गुलारिया गावातील रहिवासी असलेल्या ओमवती याच वाटेनं आपल्या शेताकडे जात होत्या. त्याचं लक्ष तुटलेल्या रुळावर गेलं आणि बघितलं की ट्रेनही येणार होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी तत्काळ मोठा निर्णय घेतला आणि लाल साडी हलवून ट्रेन थांबवली. हे वाचा - पतीशिवाय महिलेचं 6 प्रियकरांशी होतं अफेअर; कळताच बॉसनं काढून टाकलं कामावरून, आता.. पायलटने ओमवतीला ट्रेन का थांबवण्याचं कारण विचारलं असता तिनं त्याला सोबत घेऊन तुटलेला रूळ दाखवला. यानंतर रेल्वे अर्धा तास थांबवून रूळ दुरुस्त करण्यासाठी रेल्वे टीमला पाचारण करण्यात आलं. रूळ दुरुस्त केल्यानंतर ट्रेन निघाली.ये घटना एटा के अबागढ़ ब्लॉक के गुलरिया गांव के समीप की है। पैसेंजर ट्रेन एटा से टूण्डला जा रही थी। माताजी को उनकी सूझबूझ के लिए सलाम है।🙏
— SACHIN KAUSHIK (@upcopsachin) March 31, 2022
ओमवती म्हणाल्या, मला जे योग्य वाटलं ते मी केलं ओमवती या धाडसी महिलेनं सांगितलं की, “लाल झेंडा हे धोक्याचे लक्षण आहे हे मला चांगलं माहीत होतं आणि लाल झेंडा दाखविल्यामुळे धोक्यामुळे ट्रेन थांबते, असंही मी गावात ऐकलं आहे. चांगली गोष्ट म्हणजे मी लाल साडी नेसली होती आणि मला जे योग्य वाटलं ते मी केलं. सोशल मीडियावर लोक रेल्वे मंत्रालयाकडे ओमवती यांचा सन्मान करण्याची मागणी करत आहेत. लाइनमन दिसंबर सिंह हे रजेवर होते रेल्वे लाइनमन दिसंबर सिंह हे रजेवर होते. त्यामुळं दुसऱ्या लाइनमनला बोलावण्यात आलं. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं. घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळावर काम सुरू होतं. त्यामुळे पथक लवकर पोहोचलं. त्याचबरोबर या महिलेच्या समजूतदारपणाचं आणि तिच्या धाडसाचं सोशल मीडियापासून आजूबाजूच्या परिसरातून कौतुक होत आहे.ये घटना एटा के अबागढ़ ब्लॉक के गुलरिया गांव के समीप की है। पैसेंजर ट्रेन एटा से टूण्डला जा रही थी। माताजी को उनकी सूझबूझ के लिए सलाम है।🙏
— SACHIN KAUSHIK (@upcopsachin) March 31, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Railway track