Home /News /national /

गोरखनाथ मंदिरातल्या हल्ल्याचा Live Video Viral, अशा आवळल्या आरोपीच्या मुसक्या

गोरखनाथ मंदिरातल्या हल्ल्याचा Live Video Viral, अशा आवळल्या आरोपीच्या मुसक्या

गोरखनाथ मंदिराच्या (Gorakhnath Temple) गेटवर तैनात असलेल्या पीएसी जवानांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    गोरखपूर, 04 एप्रिल: उत्तर प्रदेशातील गोरखपूर (Gorakhpur News)येथील प्रसिद्ध गोरखनाथ मंदिराच्या (Gorakhnath Temple) गेटवर तैनात असलेल्या पीएसी जवानांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रविवारी संध्याकाळी उशिरा ही घटना घडली आहे. या व्हिडिओमध्ये पीएसी जवानांवर हल्ला करणारा अहमद मुर्तजा अब्बासी बराच वेळ सुरक्षा जवानांना चकवा देताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये अहमद मुर्तजा अब्बासी गोरखनाथ मंदिराच्या गेटजवळून धारदार शस्त्राने वार करून दोन पीएसी जवानांना जखमी करत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी पोलीस बंदोबस्तात गुंतले आहेत. व्हिडिओमध्ये काही पोलीस त्याला रोखण्यासाठी त्याच्या दिशेने विटा फेकताना दिसताहेत. यादरम्यान काही स्थानिक लोकही त्याला पकडण्यासाठी मदत करताना दिसतात आणि शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पीएसीच्या 20 व्या बटालियनचे दोन जवान गोपाल गौंड आणि अनिल पासवान रविवारी संध्याकाळी उशिरा गोरखनाथ मंदिराच्या मुख्य गेटवर तैनात होते. दरम्यान अहमद मुर्तजा अब्बासी हातात पिशवी घेऊन गोरखनाथ मंदिराच्या मुख्य गेटवर पोहोचला आणि पीएसी जवानांशी झटापट सुरू केली. त्यानंतर अचानक त्याने पिशवीतून कापडात गुंडाळलेले दाओ (तीक्ष्ण हत्यार) काढून पीएसी जवानांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं. यादरम्यान आरोपी अहमद मुर्तजालाही खूप दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस सध्या या हल्ल्यामागील हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी, या प्रकरणात दहशतवादी एंगलची भीती असल्याने, यूपी एटीएस या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहे. आरोपी मुर्तजानं IIT मधून केलंय केमिकल इंजिनिअरिंग आरोपीचं पूर्ण नाव अहमद मुर्तजा अब्बासी असं आहे, जो गोरखपूरच्या सिव्हिल लाइन्समध्ये राहणारा मनीर अहमद यांचा मुलगा आहे. त्याचे घर अब्बासी नर्सिंग होमच्या शेजारी आहे. मुर्तजाने आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलं आहे. मुर्तजाचे जबाब घेतल्यानंतर पोलीस अधिकारी त्याच्या घरी गेले आणि त्याचे वडील मुनीर अहमद यांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याचे वडील मुनीर अहमद हे देखील अभियंता असल्याचे समोर आलं. मुर्तजाचे कुटुंब पूर्वी मुंबईत राहत होते आणि तेथून गोरखपूरला आले आणि ऑक्टोबर 2020 मध्ये सिव्हिल लाईन्समध्ये स्थायिक झाले. मुर्तजाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. शनिवारी रात्री उशिरापासून तो घरातून बेपत्ता असून ते त्याचा शोध घेत होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Uttar pradesh news

    पुढील बातम्या