राज्यपालांनी आणखी एक ट्वीट करत असं म्हटलं आहे की, 'पश्चिम बंगाल पोलिसांनी लोकशाहीसाठी लाजिरवाणी असणारी राजकीय हिंसा, तोडफोड, जाळपोळ, भय हे थांबवायला हवं. निवडणुकीनंतरच बंगालमध्ये हिंसा का होते? लोकशाहीवर हल्ला का होत आहे? धनखड म्हणाले की 'भीतीदायक बातम्या मिळत आहेत, लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत आहेत.' ममतांना राष्ट्रपती लागवट लागू होण्याचा संशय त्याचवेळी काळजीवाहू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, शपथ घेतल्यानंतर त्या या विषयाला सामोऱ्या जातील. मात्र राज्यात भाजपला राष्ट्रपती लागवट लागू करायची आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप जातीय हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ममता यांनी केला. हे वाचा-देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा दरम्यान ममता बॅनर्जींच्या कालीघाट निवासस्थानी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यामध्ये एकंदरित बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान या हिंसाचारास टीएमसी आणि त्यांचे कार्यकर्तेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. देश कोरोनाशी लढत असताना यावेळी बंगालमधून समोर येणारी दृश्य भयावह आहेत.PM called and expressed his serious anguish and concern at alarmingly worrisome law & order situation @MamataOfficial
I share grave concerns @PMOIndia given that violence vandalism, arson. loot and killings continue unabated. Concerned must act in overdrive to restore order. — Governor West Bengal Jagdeep Dhankhar (@jdhankhar1) May 4, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm west bengal, Mamata banerjee, PM narendra modi, West Bengal bjp, West Bengal Election