नागपूर, 4 मे: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल (West Bengal assembly election result) जाहीर झाल्यानंतर तेथे हिंसाचाराच्या (violence) अनेक घटना घडल्याचं समोर आलं आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पश्चिम बंगाल **(West Bengal)**मध्ये झालेल्या या घटनांवर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि इतर राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? पश्चिम बंगालमधील स्थिती ही अक्षरश: लोकशाहीची हत्या आहे. लोकशाहीला काळीमा फासणारी घटना तेथे सुरू आहे. स्टेट स्पॉन्सर टेररिझम काय असतं हे बंगालमध्ये आपल्याला पहायला मिळत आहे. बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केले जात आहेत. घरे जाळली जात आहेत. महिलांसोबत दुर्व्यवहार केले जात आहेत. ही अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे.
पश्चिम बंगालमध्ये राज्य पुरस्कृत दहशतवाद,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 4, 2021
स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे आता गप्प का?
नागपूर येथे आज सायंकाळी माध्यमांशी साधलेला संवाद...#BengalBurning pic.twitter.com/FDcSEBmekY
बंगालपाठोपाठ UP मध्ये देखील भाजपला धक्का, अयोध्येत पराभव; काशी-मथुरेत अशी अवस्था मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे की, स्वत:ला पुरोगामी म्हणवणारा एकही नेता यावर बोलायला तयार नाही. यावर कुठल्याही प्रकारे निषेध करायला तयार नाहीये. जे रोज सकाळी सकाळी टीव्ही समोर येऊन बोलतात असेही नेते आता चूप आहेत म्हणजे त्यांचंही समर्थन कुठेतरी या बंगालमधील हिंसाचाराला आहे का? असा आमचा सवाल आहे. बंगालमधील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत आम्ही उभे आहोत अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. निवडणूक निकालानंतर हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटना समोर आल्यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पश्चिम बंगालमधील घटनांप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. कुठे मारहाण झाली तर कुठे जाळपोळ झाली या सर्व घटनांचा चौकशी अहवाल सादर करण्यास पश्चिम बंगाल सरकारला सांगण्यात आले आहे.

)







