मराठी बातम्या /बातम्या /देश /अजबच! DNA चाचणी करून शोधला कुत्र्याचा खरा मालक, हे कसं शक्य झालं?

अजबच! DNA चाचणी करून शोधला कुत्र्याचा खरा मालक, हे कसं शक्य झालं?

एका कुत्र्यावरुन झालेलं भांडणं DNAचाचणीचा अहवाल (DNA Test of Dog) आल्यानंतर मिटलं आहे. टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर हे सिद्ध झालं, की कुत्र्याचा खरा मालक कोण आहे.

एका कुत्र्यावरुन झालेलं भांडणं DNAचाचणीचा अहवाल (DNA Test of Dog) आल्यानंतर मिटलं आहे. टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर हे सिद्ध झालं, की कुत्र्याचा खरा मालक कोण आहे.

एका कुत्र्यावरुन झालेलं भांडणं DNAचाचणीचा अहवाल (DNA Test of Dog) आल्यानंतर मिटलं आहे. टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर हे सिद्ध झालं, की कुत्र्याचा खरा मालक कोण आहे.

भोपाळ 19 मार्च : मध्य प्रदेशच्या होशंगाबादमधून एक अतिशय रंजक गोष्ट समोर आली आहे. आतापर्यंत अनेकदा आपण संपत्तीच्या कारणामुळे किंवा नवजात बालकांची बदली झाल्याच्या कारणांमुळे DNAचाचणी केल्याचं ऐकलं असेल. मात्र, होशंगाबादमध्ये एका कुत्र्यावरुन झालेलं भांडणं DNAचाचणीचा अहवाल (DNA Test of Dog) आल्यानंतर मिटलं आहे. टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर हे सिद्ध झालं, की कुत्र्याचा खरा मालक कोण आहे. या कुत्र्याच्या मालकीवरुन गेल्या चार महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता.

होशंगाबादच्या देहात ठाण्यात मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये याबाबत तक्रार करण्यात आली होती. एक कुत्र्यावर शादाब खान आणि कृतिक शिवहरे हे दोघंही आपला हक्क सांगत होते पत्रकार असलेल्या शादाब खान यांचं असं म्हणणं होतं, की त्यांनी पचमढीवरुन हे कुत्रं आणलं आहे, तर एबीवीपीसोबत जोडलेल्या कार्तिकचं असं म्हणणं होतं, की त्यांनी बाबईवरुन हे कुत्र विकत आणलं आहे. दोन्ही स्थळं होशंगाबाद जिल्ह्यातच आहेत. पोलिसांच्या अडचणीत वाढ तेव्हा झाली जेव्हा कुत्र्यानं दोन्ही मालकांसोबत ओळख असल्यासारखं दाखवलं.

पोलिसांनी हा वाद सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र वाद सुरुच असल्यानं अखेर कुत्र्याची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर जनावरांच्या डॉक्टरनं कुत्र्याच्या रक्ताचे नमुने घेतले आणि शादाब खाननं दिलेल्या माहितीनुसार लेब्राडोर कुत्राला जन्म देणाऱ्या कुत्रीच्या रक्ताचे नमूने हैदराबादच्या लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी पाठवले. हैदराबादवरुन आलेल्या अहवालानंतर देहात ठाण्याचे पोलीस अनूप सिंह यांनी सांगितलं, की हे प्रकरण 2020 चं आहे. अहवालातून हे स्पष्ट झालं आहे, की कुत्र्याचा मालक शादाब खान आहे.

शादाब खानचं म्हणणं होतं, की त्यांचं कोको नावाचं काळ्या रंगाचं कुत्र ऑगस्टमध्ये हरवलं आहे. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रारही दिली होती. यानंतर शादाब यांनीच पोलिसांनी फोन करुन कळवलं की त्यांचं हरवलेलं कुत्र त्यांनी कृतिक शिवहरेच्या घरी पाहिलं आहे. मात्र, शिवहरे यांचं असं म्हणणं होतं, की हा कोको नसून टायगर आहे आणि त्यानं हे कुत्र अकरा ऑगस्टला बाबईमधून विकत घेतलं आहे. या काळात कुत्रा दोन्ही मालकांना ओळखत होता. त्यामुळे पोलिसांचं काम अधिकच कठीण झालं. मात्र, अखेर डीएनए अहवालामुळे कुत्र्याचा खरा मालक सापडला.

First published:

Tags: Dog, India, Kidnapping, Owner of dog, Police action, Shocking news, Test