जाहिरात
मराठी बातम्या / देश / कायच्या काय! आता चक्क कुत्र्याविरोधात पोलिसांत तक्रार; मुख्यमंत्र्यांच्या पोस्टसोबतचं ते कृत्य अंगलट

कायच्या काय! आता चक्क कुत्र्याविरोधात पोलिसांत तक्रार; मुख्यमंत्र्यांच्या पोस्टसोबतचं ते कृत्य अंगलट

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

चक्क एका कुत्र्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामागाचं कारणही तितकंच आगळंवेगळं आहे.

  • -MIN READ Andhra Pradesh
  • Last Updated :

अमरावती 14 एप्रिल : नुकतंच उंदराच्या हत्येचं एक प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. यात उंदराची हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात 30 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता यापेक्षाही अजब घटना समोर आली आहे. यात चक्क एका कुत्र्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामागाचं कारणही तितकंच आगळंवेगळं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

झालं असं, की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर एका कुत्र्याने फाडले. हे पोस्ट फाडल्याबद्दल चक्क त्याच्याविरोधाच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. एका घराच्या भिंतीवर असलेल्या वाय एस जगन मोहन रेड्डी यांचं पोस्टर या कुत्र्याने फाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर येताच विरोधकांनी खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. यानंतर आता विजयवाडा इथे विरोधी पक्ष टीडीपीच्या काही महिला कार्यकर्त्यांनी उपहासात्मकपणे ही तक्रार दाखल केली आहे. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आली असून राजकारणात कुत्र्यांनाही सोडलं जात नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनीही मजा घेतली आहे. उंदीर हत्या प्रकरण कोर्टात! पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे येणार निर्णय, होऊ शकते 5 वर्षांची शिक्षा पोलिसांत तक्रार दाखल करणाऱ्या महिलांनी स्थानिक माध्यमांसोबत याप्रकरणाबाबत बोलताना म्हटलं, की ‘ज्यांच्या पक्षाने 151 विधानसभा जागा जिंकल्या त्या जगन मोहन रेड्डी यांच्याबद्दल मनात खूप आदर आहे. अशा नेत्याचा अपमान करून या कुत्र्याने राज्यातील सहा कोटी जनतेला दुखावलं आहे. आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या कुत्र्याला आणि यासाठी जबाबदार असलेल्यांना अटक करा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात