नवी दिल्ली, 11 एप्रिल : भारतात गुन्हेगारी कमी नाही. देशात चोरीपासून खुनापर्यंतच्या घटना रोज घडत आहेत. अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत. सुनावणीबाबत फक्त तारखा वर तारखा दिल्या जातात. अशात देशाला माणसांपेक्षा उंदरांना न्याय मिळवून देण्याची घाई झालेली दिसत आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी उंदीराची हत्या झाली, हो, तुम्ही बरोबर वाचलात. आता उंदीर मारण्याच्या प्रकरणात न्यायालय निर्णय येऊ शकते. उंदराच्या हत्येचे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून आता आरोपींना शिक्षा होऊ शकते.
आम्ही मस्करी करतोय असं तुम्हाला वाटत असेल. पण हे प्रकरण सत्य घटना आहे. उंदराच्या हत्येचे हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बदाऊन येथील आहे. सध्या सुरू असलेल्या उंदराच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीस पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात उंदराच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचाही समावेश करण्यात आला आहे. आता या आरोपपत्राच्या आधारे न्यायालय या प्रकरणी निकाल देणार आहे. या उंदराचा मृत्यू गेल्या वर्षी 25 नोव्हेंबरला झाला होता. एका पानवाल्याने उंदराला नाल्यात बुडवून मारले होते. प्राणीप्रेमींनी ते पाहून पोलिसांत गुन्हा दाखल केला. काय आहे संपूर्ण प्रकरण? वास्तविक, गेल्या वर्षी मनोज नावाच्या पानवाल्याने उंदीर पकडला होता. या उंदराला त्याने नाल्यात बुडवलं. उंदराच्या पोटाला दगड बांधला होता. त्याचवेळी प्राणीप्रेमी विकेंद्र शर्मा तेथून जात होते. त्याने उंदराला वाचवण्याचा प्रयत्न केला पण उंदीर आधीच मेला होता. उंदराला एवढा वेदनादायक मृत्यू देताना पाहून विकेंद्रला राग आला आणि मनोजवर गुन्हा दाखल झाला. एफआयआरनंतर उंदराचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि तोच अहवाल आता चार्जशीटसोबत जोडण्यात आला आहे. वाचा - लग्नाआधीच दारूच्या नशेत नवरदेवाचं कांड, नवरीने नातं तोडत थेट पोलीसच बोलावले पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते उंदराच्या पोस्टमॉर्टम अहवालात त्याचा मृत्यू नाल्यात बुडल्यामुळे नसून गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, त्याचे यकृत आणि फुफ्फुसे आधीच खराब होते. त्यामुळे मनोजच्या शिक्षेची आशा कमी आहे. या प्रकरणाबाबत वनविभागाचे म्हणणे आहे की, उंदीर मारणे हा गुन्हा नाही. परंतु, प्राणी क्रूरतेनुसार या प्रकरणात आरोपींना शिक्षा होऊ शकते. मनोजवरील आरोप सिद्ध झाल्यास त्याला 10 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय त्याला दोन ते पाच वर्षांची शिक्षाही होऊ शकते. आता या प्रकरणात कोण जिंकते? पानवाला की प्राणीप्रेमी हे पाहणे महत्त्वाचे आहे.