मराठी बातम्या /बातम्या /देश /

'अग्निपथ'च्या विरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांनी उचललं हे पाऊल

'अग्निपथ'च्या विरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांनी उचललं हे पाऊल

बिहारमधील जिल्ह्य़ांमध्ये हिंसाचाराच्या सर्वात वाईट घटना घडल्या, ज्यात गाड्या पेटवणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. पोलिसांनी 148 एफआयआर नोंदवले आणि 805 लोकांना अटक केली आहे.

बिहारमधील जिल्ह्य़ांमध्ये हिंसाचाराच्या सर्वात वाईट घटना घडल्या, ज्यात गाड्या पेटवणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. पोलिसांनी 148 एफआयआर नोंदवले आणि 805 लोकांना अटक केली आहे.

बिहारमधील जिल्ह्य़ांमध्ये हिंसाचाराच्या सर्वात वाईट घटना घडल्या, ज्यात गाड्या पेटवणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. पोलिसांनी 148 एफआयआर नोंदवले आणि 805 लोकांना अटक केली आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 20 जून : 'अग्निपथ' या नव्या लष्करी भरती योजनेच्या विरोधाची लाट ओसरली असताना (Agitation Against Agnipath), देशभरातील राज्य पोलिसांनी हिंसक आंदोलकांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून त्यापैकी बहुतांश बिहारमधील आहेत. बिहारमधील जिल्ह्य़ांमध्ये हिंसाचाराच्या सर्वात वाईट घटना घडल्या, ज्यात गाड्या पेटवणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. पोलिसांनी 148 एफआयआर नोंदवले आणि 805 लोकांना अटक केली आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य गृह सचिव चैतन्य प्रसाद म्हणाले की, सार्वजनिक उपद्रव निर्माण करणाऱ्या आणि आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तांना लक्ष्य करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. ते म्हणाले, जिल्हा पोलिसांना हल्लेखोरांना पकडण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवारी तारेगाना स्टेशनवर दगडफेकीत संशयित भूमिकेसाठी मसुरीमधील चार कोचिंग इन्स्टिट्यूटच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाटणा जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी सांगितलं की, शहरात आग लावल्याप्रकरणी 191 जणांना अटक करण्यात आली आहे. Bharat Bandh: अग्निपथ योजनेला विरोध वाढला, सोमवारी भारत बंदची हाक, अनेक राज्यांमध्ये शाळा बंद तेलंगणाच्या सिकंदराबादमध्ये, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना हिंसाचारात बाहेरील लोकांचा सहभाग आढळला नाही. रेल्वेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदिप संदिल्य म्हणाले, “कोणत्याही बाहेरच्या असामाजिक घटकांचा यात सहभाग नव्हता आणि हे हल्ले केवळ लष्करातील नोकरीच्या इच्छुकांनी केले होते. ज्यांची कोचिंग संस्थांच्या प्रमुखांनी दिशाभूल केली होती. या हिंसाचारामागील संशयित सूत्रधार, कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक आता तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू आहे." संदीप संदिल्य म्हणाले, 'या सर्वांना गेल्या दोन दिवसांत अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आम्ही रविवारी नव्याने अटक करू शकलो नाही, कारण आम्ही हिंसाचारात भाग घेतलेल्या आणखी निदर्शकांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेत आहोत. उत्तर प्रदेशातील हिंसक निदर्शनांच्या संदर्भात पोलिसांनी एकूण 387 अटक केल्या आहेत. यातील 145 जणांवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 151 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 242 जणांवर हिंसाचार आणि जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.' Agnipath सारख्या योजना 'या' देशांमध्येही लागू, वय, कालावधी, सेवा याबाबत नियम मात्र वेगळे उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, रविवारपर्यंत पोलिसांनी निदर्शनांसंदर्भात 34 एफआयआर नोंदवले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, अहमदाबादमध्ये अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी परवानगीशिवाय जमलेल्या १४ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शहरातील मेघाणीनगर परिसरात एका ठिकाणी सुमारे 100 लोक जमले होते.
First published:

Tags: Army

पुढील बातम्या