नवी दिल्ली, 19 जून : केंद्र सरकारच्या अग्निपथ लष्करी भरती योजनेला (Agneepath Scheme) बिहार**,** झारखंड, यूपीसह अनेक राज्यांमध्ये प्रचंड विरोध होत आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुण रस्त्यावर उतरले असून काही संघटनांनी 20 जून रोजी भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. केंद्र सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. या ठिणगी सर्वप्रथम बिहार पडली. त्यानंतर बघता बघता देशातील अनेक राज्यांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले. यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. ज्यामध्ये रेल्वे, बसेससह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा-कॉलेज बंद सोमवारी भारत बंदमुळे अनेक राज्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव राजेश शर्मा यांनी सांगितले की, काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील सर्व शाळा 20 जून रोजी बंद राहतील. खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते पुढे म्हणाले. त्याचप्रमाणे बिहारमध्येही शाळा बंद करण्यात आल्या आहेत. 20 जूनपासून उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू होणार असल्याची माहिती आहे, मात्र ज्याप्रकारे हिंसाचार आणि तोडफोडीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. केरळमध्ये सुरक्षा वाढवली 20 जून रोजी भारत बंदच्या आवाहनादरम्यान, केरळ पोलिसांनी सांगितले की सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या किंवा हिंसाचारात सहभागी असलेल्या कोणालाही अटक करण्यासाठी संपूर्ण पोलिस दल तैनात केले जाईल. राज्य पोलीस प्रमुख अनिल कांत यांनी कर्मचार्यांना सार्वजनिक हिंसाचार आणि व्यावसायिक आस्थापने सक्तीने बंद करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कांत यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना 20 जून रोजी न्यायालये, केरळ राज्य विद्युत मंडळाची कार्यालये, परिवहन महामंडळ आणि खाजगी बसेस आणि सरकारी कार्यालयांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
या आहेत जगातील 10 शक्तिशाली सेना, भारताचे स्थान जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान!
अनेक गाड्या रद्द ‘अग्निपथ’ योजनेला सुरू असलेल्या विरोधामुळे पूर्व रेल्वेने रविवारी कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या इतर भागांना जोडणाऱ्या 29 गाड्या रद्द केल्या. बिहारच्या विविध भागात, महाराष्ट्रातील वांद्रे आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे धावणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर दोन गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. अग्निपथच्या अर्जदारांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल अग्निपथ योजनेंतर्गत सशस्त्र दलात सामील होऊ इच्छिणाऱ्या सर्व अर्जदारांना एक हमीपत्र द्यावे लागेल की ते कोणत्याही निदर्शनात, जाळपोळ किंवा तोडफोडीमध्ये सहभागी झालेले नाहीत. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या तीन शाखांमध्ये भरतीच्या नवीन योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसक निषेधाच्या दरम्यान लष्करी व्यवहार विभागातील अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांची ही टिप्पणी आहे.