Home » photogallery » national » SCHEMES LIKE AGNIPATH ARE ALSO APPLICABLE IN OTHER COUNTRIES RULES REGARDING AGE DURATION AND SERVICES IN THE ARMY MH PR

Agnipath सारख्या योजना 'या' देशांमध्येही लागू, वय, कालावधी, सेवा याबाबत नियम मात्र वेगळे

Agnipath Scheme: अग्निपथ (Agnipath scheme) या भारतीय लष्करात अल्प मुदतीच्या भरती योजनेबाबत देशातील तरुणांमध्ये नाराजी आहे. या योजनेंतर्गत 17 वर्षांच्या तरुणांना 4 वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती करून त्यांना अग्निवीर म्हणून ओळखले जाईल. मात्र, सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या या योजनेच्या अटी व शर्ती मान्य नाहीत. अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यापासून संतप्त लोकांनी देशाच्या काही भागात जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली. सरकारने असे म्हटले असले तरी, इतर देशांमध्येही अशा प्रकारच्या भरती सैन्यात होतात.

  • |