धक्कादायक! त्याला घ्यायचा होता पोलिसांचा बदला, क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत टाकलं विष

धक्कादायक! त्याला घ्यायचा होता पोलिसांचा बदला, क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत टाकलं विष

देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असताना पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

चंदीगड, 11 जून: देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असताना पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विषारी पदार्थ मिसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वेळीच हा प्रकार निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. जोधेवाल येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिसांचा बदला घेण्याचा भावनेतून एका तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा...कोरोना विषाणूचं संशोधन माझ्या बॉडीवर करा, पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्याची मागणी

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भावाला अटक केल्याने संतापलेल्या एका तरूणाने आपल्या मित्राच्या मदतीच्या मदतीनं जोधेवालच्या कृ्ष्णा कॉलनी परिसरातील एका क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विषारी पदार्थ मिसळला. हे पाणी पिऊन तेथील पोलिस शिपाई, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांचा मृत्यू होईल, असा आरोपीचा यामागे हेतू होता.

पोलिस कॉस्टेबल गुरपिंदर सिंग पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा उग्र वास आला. तसेच पाणी प्यायल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांची तपासणी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी आरोपी वरिंदर उर्फ नितीका खुंसी (रा. कृ्ष्णा कॉलनी), गौरव आणि त्याची बहीण सिमरनविरुद्ध हत्येचा कट रचल्याप्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा...COVID-19: मुंबईतील 11 लाख घरं सील, 50 लाख लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव

तपास अधिकारी एएसआय राधेश्याम यांनी सांगितले की, आरोपी वरिंदरा भाऊ जतिंदर सिंग यांच्या विरोधात लुटमारी आणि लुटमारीची योजना बनवणे यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी पोलिसांचा बदला म्हणून या पाण्याच्या टाकीत विषारी पदार्थ मिसळला.

जतिंदरला अटक करणारा शिपाई गुरपिंदर सिंगचा मृत्यू होईल. दरम्यान, काही दिवसांपूर्वी  पोलिसांनी आरोपी जतिंदरला अटक केली होती. यावेळी या टीममध्ये शिपाई गुरपिंदर सिंगही होते. गुरपिंदर यांची ड्युटी कृष्णा कॉलनीमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये लागली होती. आरोपी वरिंदरने शिपाई गुरपिंदर यांचा बदला घेण्याचे ठरवले. त्याने आपल्या मित्रांसह मिळून त्याची हत्या करण्याचा कट आरोपींनी रचला होता.

संकलन- संदीप पारोळेकर

First published: June 11, 2020, 6:50 PM IST

ताज्या बातम्या