कोरोना विषाणूचं संशोधन माझ्या बॉडीवर करा, पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्याची मागणी

कोरोना विषाणूचं संशोधन माझ्या बॉडीवर करा, पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्याची मागणी

जगभरात माकडाला लस देऊन त्यांच्यावर प्रयोग घेतले जात आहेत. त्यात एका कैद्यानं वेगळीच मागणी करून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

  • Share this:

सोलापूर, 11 जून: राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सरकार अन् प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र कोरोनावर अद्याप कोणतीही लस, ठोस तसेच उपचार अद्याप सापडलेला नाही.

जगभरात माकडाला लस देऊन त्यांच्यावर प्रयोग घेतले जात आहेत. त्यात एका कैद्यानं वेगळीच मागणी करून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. कोरोना विषाणूचं संशोधन माझ्या बॉडीवर करा, अशी मागणी सोलापुरात पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या कैद्यानं केली आहे.

हेही वाचा...बाबा रामदेव यांनी सांगितला Corona वरचा आयुर्वेदिक उपचार, 2 रामबाण औषधींचा शोध

पॅरोलवर असलेला कैदी गणेश हनुमंत घुगे याने माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली आहे. कोरोनाच्या लसीसाठी आपले स्वतः चे जीवन अर्पण करण्यासाठी आपण तयार असल्याचं गणेश घुगे यांनी लेखी निवेदनात म्हटलं आहे. एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आलं आहे.

गणेश घुगे हा माढा तालुक्यातील कुर्डूवाडी गावचा रहिवासी आहे. गणेश घुगे हा सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून सध्या तो कोरोना पॅरोलवर बाहेर आला आहे.

हेही वाचा...मुंबईत मान्सूनचा पहिला बळी? खेळता खेळता नाल्यात पडला 5 वर्षांचा चिमुरडा

कोरोना विषाणुच्या लस संशोधनाच्या कामासाठी जगभरात माकडासह अन्य प्राण्याचा वापर केला जात आहे. दरम्यान कोरोनाच्या आजारावर उपचार संशोधनासाठी माझे शरीर मी स्वच्छेने देण्यास तयार आहे. जर शासनामार्फत अशी संधी मिळाली तर मी माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे मी समजेल. देशासाठी, समाज हितासाठी माझे जीवन उपयोगी यावे असे मला प्रकर्षाने वाटते असेही कैदी गणेश घुगे यांनी प्रशासनाकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: June 11, 2020, 6:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading