Home /News /national /

फक्त बाहेरच नाही, घरातही मास्क वापरा- मोदींनी केलं आवाहन

फक्त बाहेरच नाही, घरातही मास्क वापरा- मोदींनी केलं आवाहन

सुरुवातीला फक्त आजारी व्यक्तींनीच मास्क वापरावा, असं सांगितलं जात होतं. पण एका जागतिक अभ्यासातून मास्कविषयी नवी माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 6 एप्रिल : Coronavirus शी लढण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच सगळ्यात प्रभावी उपाय आहे. बाहेर पडताना, दुसऱ्याला मदत करायला जाताना मास्क वापरयला विसरू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. फक्त बाहेरच नाही, तर घरात वावरतानाही तोंड, नाक झाका असं पंतप्रधान म्हणाले आहे. सुरुवातीला फक्त आजारी व्यक्तींनीच मास्क वापरावा, असं सांगितलं जात होतं. आता कोरोनाव्हायरसचा वाढलेला फैलाव पाहता प्रत्येकानेच मास्क वापरा किंवा स्वच्छ रुमालाने नाक आणि तोंड बांधून घ्या असं सांगितलं जात आहे. नेचर मेडिसिन या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात, चेहरा मास्कने झाकल्यामुळे कोरोनाव्हायरस आणि इतर सीझनल इन्फेक्शनचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो, असं दिसून आलं आहे. भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिन आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आज संपूर्ण मानवजातीवर महासंकट आहे. कोरोनाविरुद्धचा लढा नक्कीच सोपा नाही. ही लढाई मोठी आहे आणि काळजी घेतली नाही तर जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही लढाई लढताना सतर्क राहाणं आणि संयम राखणं आवश्यक आहे. समोर मोठी आव्हानं आहेत त्यांचा सामना करण्यासाठी आणि देशसेवेसाठी कटिबद्ध असणं महत्त्वाचं आहे". वाचा - क्वारंटाइन व्यक्तींच्या त्या VIDEOची आदित्य ठाकरेंनी घेतली दखल, मागितली माफी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना काय म्हणाले की, "आपल्या कुटुंबीयांना आणि ओळखीच्या किमान 5 व्यक्तींना मास्क भेट द्या आणि तो कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी वापरण्याचा सल्ला द्या." तोंडावर मास्क लावल्यामुळे कोरोनाव्हायरस होणारच नाही असं नाही, पण संक्रमित व्यक्तीने हा मास्क लावला तर इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, असं जागतिक अभ्यासात दिसून आलं आहे. ड्रॉपलेट्स, खोकला शिंकेतून उडणारे थेंब यातून होणारा संसर्ग मास्कमुळे रोखता येतो, असं या अभ्यासात म्हटलं आहे. वाचा - कोरोनामुळे माणुसकीच हरपली, पतीच्या अंत्यसंस्काराला गावकऱ्यांनी दिला नकार अखेर.. भारतात कोरोनाव्हायरची लागण झालेल्या अनेकांना कुठलंही लक्षण दिसलेलं नाही. त्यामुळे अशा निरोगी वाटणाऱ्या व्यक्तींमधून इतरांंना संसर्ग होऊ शकतो म्हणूनच सर्वांनी मास्क वापरावा, असं आवाहन तज्ज्ञ आता करत आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरही बंदी राहणार कायम, हा आहे सरकारचा पुढचा प्लान
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या