चंदौली, 06 एप्रिल : कोरोनाव्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर (Pandemic) सर्व देशभर लॉकडाउन आहे. या प्रकरणात चांदौली जिल्ह्यातील एका घटनेने लोकांचे डोळे ओलावले. खरंतर, चांदौली जिल्ह्यात आजारी पतीच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारास जाण्यास नकार दिला. त्यामुळे पत्नीने स्वतः पतीला अग्नी देऊन अंत्यसंस्कार विधी केले.
चांदौली जिल्ह्यातील दीनदयाल नगरातील प्रभाग क्रमांक-3 मध्ये राहणारी गुडिया जैस्वालचे लग्न चांदौलीच्याच बाबूरी येथे झाले होते. गुडियाचा पती संतोष जयस्वाल हा गेल्या पंधरा दिवसांपासून आजारी होता आणि त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी संतोष जयस्वालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेवटचा संस्कार करण्याची वेळ आली तेव्हा कोरोनाच्या भीतीने गावक्यांनी अंत्यसंस्कारास जाण्यास नकार दिला.
जेव्हा गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला, तेव्हा गुडियाने तिच्या पतीचे स्वत: अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. गुडिया आणि तिचा भाऊ लालू जैस्वाल हे गंगा नदीच्या काठी स्मशानभूमीत मृतदेह ऑटोमध्ये घेऊन गेले. जिथे गुडियाने पतीला अग्नी अर्पण करत अंत्यसंस्कार केले.
या प्रकरणात गुडिया जयस्वालने सांगितले की, जेव्हा पतीचा आजारपणानंतर मृत्यू झाला. त्याच्या सासरच्या मंडळीतील किंवा त्याच्या मामाच्या बाजूच्या लोकांनीही अंत्यसंस्कारात भाग घेतला नव्हता. त्यामुळे मी स्वत:च पतीचे अंत्यसंस्कार केले. सगळेजण कोरोनाला घाबरले असल्याचंही तीने सांगितलं.
उत्तर प्रदेशात कोरोना रूग्णांची संख्या 296 वर
उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूची लागण होण्याची 296 घटना समोर आल्या आहेत. यात तबलीगी जमात (कोविड -19) मधील 138 लोकांचा समावेश आहे. प्रधान सचिव (वैद्यकीय व आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी रविवारी लखनौमध्ये पत्रकारांना सांगितले की, 'आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 296 झाली आहे. त्यापैकी तीन-चार जिल्हे अशी आहेत जिथे अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.