जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / क्वारंटाइन व्यक्तींच्या त्या VIDEOची आदित्य ठाकरेंनी घेतली दखल, मागितली माफी

क्वारंटाइन व्यक्तींच्या त्या VIDEOची आदित्य ठाकरेंनी घेतली दखल, मागितली माफी

Mumbai: Shiv Sena leader Aditya Thackeray during a press conference at Sena Bhavan in Mumbai, Thursday, Oct. 24, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad)(PTI10_24_2019_000234B)

Mumbai: Shiv Sena leader Aditya Thackeray during a press conference at Sena Bhavan in Mumbai, Thursday, Oct. 24, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad)(PTI10_24_2019_000234B)

‘ज्या लोकांची गैरसोय झाली त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं आहे. असं पुन्हा होणार नाही.’

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 06 एप्रिल : मुंबईत कोरोनाचा धोका वाढतो आहे. दररोज नवे रूग्ण दाखल होत आहेत. त्यासाठी महापालिका आणि राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. रूग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी महापालिकेने शहरातल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये सोय केली आहे. असे सगळे प्रयत्न सुरू असताना रविवारी वरळीतल्या पोद्दार हॉस्पिटमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. क्वारंटाइन असलेल्या विभागात असलेली अस्वच्छता आणि काही रूग्णांनाच झाडू मारायला सांगितला असाही आरोप होतोय. त्याची तातडीने दखल वरळीचे आमदार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यावर माहिती देत कारवाई झाल्याचं सांगितलं आहे. वळीतल्या पोद्दार हॉस्पिटलमधला तो व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्या लोकांची गैरसोय झाली त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. असे प्रकार पुन्हा घडणार नाही याची दक्षता घेऊ असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतील (Mumbai) Wockhardt रुग्णालयातील 26 नर्स आणि तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण रुग्णालय क्वारंटाइन घोषित करण्यात आलं आहे. मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचं आकडेवारीवरुन समोर येत आहे. त्यामुळे मुंबई अनेक भागांमध्ये लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात आले आहे. त्यातच कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आल्याने भीती वाढली आहे.

जाहिरात

देशात कोरोना बळींची संख्या 109 पर्यंत पोहोचली आहे. तर एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4067 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आकड्यांनुसार देशात आतापर्यंत 291 रुगांवर उपचार झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे. संपूर्ण कोरोनाग्रस्तांमध्ये 65 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

मंत्रालयाने सकाळी 9 वाजता दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 690 पोहचली असून त्यानंतर तामिळनाडून 571, दिल्ली 503, तेलंगणा 321, केरळ 314 आणि राजस्थान 253 रुग्णांची संख्या आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात