नवी दिल्ली, 12 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून एक संदेश दिला आणि त्याच दिवशीच्या मध्यरात्रीपासून 21 दिवसाचा देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला. आता हे 21 दिवस येत्या 14 तारखेला संपत आहेत. देशात Coronavirus ची साथ अद्याप आटोक्यात आल्याची चिन्हं नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. लॉकडाऊन संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. काही राज्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करून आधीच राज्य पातळीवर लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. शनिवारी पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. त्यामुळे आता हा लॉकडाऊन उठण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला उद्देशून काही संदेश देतील अशी शक्यता आहे.
#IndiaFightsCoronavirus #21daylockdown :
— Manish Desai (@DG_PIB) April 11, 2020
During the video-conferencing on #coronavirusinindia with state CMs today,
most states requested PM @narendramodi to extend the lockdown for 2 more weeks.
The Central Government is considering this request.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात चर्चा केली. त्यामध्ये बहुतेक राज्यांनी लॉकडाएऊन वाढवण्याची विनंती केली. आता यावरच केंद्र सरकार विचार करत आहे. पण यासंदर्भात आज पंतप्रधान लगेच कुठली घोषणा करण्याची शक्यता नाही. लॉकडाऊन पुढच्या काळात कसा असेल, कुठल्या पातळीवर कडक बंधनं असतील आणि कुठे मोकळीक मिळेल याची सविस्तर माहिती पुढच्या दोन दिवसात समोर येईल. हे वाचा- लॉकडाऊनमध्ये 12 तास रस्त्यावर होता मृतदेह, खिशात होत्या कोविडच्या टेस्ट स्लिप पंतप्रधान मोदी उद्या रात्री 8 वाजता पुन्हा एक महत्त्वाची घोषणा करणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. पंतप्रधान कार्यलयाकडून यासंबंधी अजूनही अधिकृत काही माहिती हाती आलेली नाही. पण मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली आणि आता त्यांच्या डोक्यात यापुढचा प्लॅन निश्चित झाला असण्याची शक्यता आहे. त्यावर ते उद्या जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. जान भी जहाँ भी देशाला उद्देशून भाषण करताना मोदींनी यापूर्वी लॉकडाऊनची अपरिहार्यता स्पष्ट केली होती. ‘जान है तो जहाँ है’ असं ते म्हणाले होते. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी प्राधान्य आणि मग आर्थिक संकटाचा सामना करू, असं त्यामागचं धोरण होतं. आता मुख्यमंत्र्यांबरोबर सुमारे 4 तास चर्चा केल्यानंतर पंतप्रधान आर्थिक बाबींवरही लक्ष केंद्रित करणार असल्याचं बोललं जात. जान भी जहाँ भी असं धोरण असल्याचं सूतोवाच पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधानांनी रुग्णोपचारांसाठी सुरक्षा किट वाढवून देण्याचं आश्वासन दिलं. कम्युनिटी ट्रान्समिशन होतंय का याविषयीही चर्चा केली. सध्या दर दिवशी 15000 रुग्णांची चाचणी करण्याची क्षमता आहे. ती आता वाढवण्यात येणार आहे. अन्य बातम्या मोठी बातमीः CBSE बोर्डाचा 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार मुंबईतल्या या हॉटस्पॉटमध्ये कोरोना रोखणं खरं आव्हान, हे PHOTO बघून येईल अंदाज