मोठी बातमीः CBSE बोर्डाचा 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) इयत्ता 10वी आणि 12 वीच्या बोर्डाचा पेपर पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या मार्च महिन्यात सुरू असलेले काही पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) इयत्ता 10वी आणि 12 वीच्या बोर्डाचा पेपर पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 2020-2021 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. बोर्डाच्या नव्या पॅटर्ननुसार 100 किंवा 80 पैकी 20 टक्के प्रश्न हे वस्तुनिष्ठ प्रकारचे असणार आहेत. याआधी 10 टक्के वस्तुनिष्ठ प्रश्नांवर भर देण्यात आला होता. मात्र या वर्षापासून वस्तुनिष्ठ प्रश्नांवर अधिक भर देण्यात येणार आहे.

CBSE बोर्डाच्या परीक्षेत 20 टक्के उद्दीष्टात्मक प्रश्नांचा समावेश करण्याचा नवीन नियम शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून लागू करण्यात येणार आहे. CBSE बोर्डाने मंडळाने ही माहिती शाळांना पाठविली आहे. बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूच्या साथीमुळे दहावी व बारावीच्या पुढे ढकललेल्या परीक्षांना हा नियम लागू होणार नाही.

हे वाचा-'हे कोणी लिहिलं आहे ते मी शोधणार', व्हायरल झालेल्या पोस्टवर भडकले रतन टाटा

देशातून लॉकडाऊन उघडल्यानंतर, जेव्हा विद्यार्थी परीक्षा देतात, तेव्हा त्यांना जुन्या पॅटर्नच्या आधारे प्रश्न विचारले जातील. 2020-2021 शैक्षणिक सत्रामधील वस्तुनिष्ठ प्रश्नांसह अध्यायदेखील बदलतील. CBSE बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार 2020-2021 च्या आगामी सत्रामध्ये उद्दीष्ट प्रश्नांचे 20 टक्के तसेच विविध विषयांचे अध्याय बदलण्यात आले आहेत. आदेशानुसार पी ब्लॉक माध्यमिक स्तराच्या 15 व्या ब्लॉकच्या विषयांसाठी रसायनशास्त्रातील सॉलिड स्टेट अध्याय 11 वी आणि 12 वी अभ्यासक्रमामधून काढून टाकण्यात आला आहे. तर मंडळाने माध्यमिक स्तराच्या गणिताच्या अभ्यासक्रमात अप्लाइड गणितासाठी नवीन पर्याय सादर केला आहे. सध्या, हा विषय शैक्षणिक सत्र 2020-21 पासून लागू करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये बेसिक गणित हा विषय घेतला आहे ते अकरावीमध्ये गणित हा विषय घेऊ शकतात. कोरोना विषाणूच्या साथीमुळे लॉकडाऊनमुळे देशातील सर्व सीबीसीएसई परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

हे वाचा-कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला, हल्लेखोरांमध्ये एक होता पॉझिटिव्ह

संपादन- क्रांती कानेटकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2020 03:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading