जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / लॉकडाऊनमध्ये तब्बल 12 तास रस्त्यावर पडून होता मृतदेह, खिशात सापडल्या कोविडच्या टेस्ट स्लिप

लॉकडाऊनमध्ये तब्बल 12 तास रस्त्यावर पडून होता मृतदेह, खिशात सापडल्या कोविडच्या टेस्ट स्लिप

लॉकडाऊनमध्ये तब्बल 12 तास रस्त्यावर पडून होता मृतदेह, खिशात सापडल्या कोविडच्या टेस्ट स्लिप

एका 77 वर्षीय कोविड संशयित, प्रवासी कामगार रस्त्याच्या कडेला मृत पडून होता. त्याचे शरीर जवळजवळ 12 तास रस्त्यावर पडून होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद, 12 एप्रिल : कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगभरात अनेकांचा जीव घेतला. यामध्ये काहींचा कोरोना झाल्यामुळे मृत्यू झाला तर काहींनी कोरोना होईल या भीतीने आत्महत्या केल्याच्या घटनाही तुम्ही पाहिल्या असतील. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे 12 तास एका कोरोना संशयिताचा मृतदेह रस्त्यावर पडून होता. गंभीर बाब म्हणजे रुग्ण रस्त्यावर फिरत असतानादेखील त्याचा कोणालाही सुगावा लागला नाही. खिशात सापडल्या टेस्ट स्लिप ही घटना हैदराबादमध्ये घडली आहे. एका 77 वर्षीय कोविड संशयित, प्रवासी कामगार रस्त्याच्या कडेला मृत पडून होता. त्याचे शरीर जवळजवळ 12 तास रस्त्यावर पडून होते. पोलिसांना त्याचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला आढळला. पोलिसांना मृताच्या खिशात कोविड चाचणी स्लिप सापडली आणि त्याने तो कोविड संशयित असल्याचं ओळखलं. अमेरिकेनं मोडला इटलीचा रेकॉर्ड, कोरोनामुळे आतापर्यंत 19,681 रुग्णांचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीची राजा कोटी येथील शासकीय रूग्णालयात तपासणी झाली. त्याला चाचण्यांसाठी कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले. रुग्णालय त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यापूर्वी तो रुग्णालयातून बाहेर पडला. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे पोलिसांना दुसर्‍या दिवशी सूचना देण्यात आली तोपर्यंत हॉस्पिटलला कोविडचा संशयित गायब असल्याची कल्पना नव्हती. यानंतर रुग्णाचा शोध सुरू झाला आणि त्याचा मृतदेह पोलिसांना रस्त्याच्या कडेला सापडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आता पुढील तपास करत आहे. दरम्यान, या रुग्णाचे कोविड रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे. तर कोविडच्या भीतीने त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. घरात बसून 12 तासांत असे जमवले 5 कोटी, सर्व रक्कम कोरोनाबाधितांना केली दान पोलिसांनी मृतेदह ताब्यात घेतला असून त्याचं ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तर व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिकमध्ये कसा गुंडाळला गेला याचाही पोलीस पुढील तपास करत आहेत. संकलन, संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात