• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • प्रत्येक भारतीयांकडे असणार युनिक हेल्थ आयडी, जाणून घ्या मोदी सरकारची काय आहे नवीन योजना

प्रत्येक भारतीयांकडे असणार युनिक हेल्थ आयडी, जाणून घ्या मोदी सरकारची काय आहे नवीन योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) पुढील आठवड्यात एक मोठी योजना सुरू करणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) पुढील आठवड्यात एक मोठी योजना सुरू करणार आहेत. यामध्ये प्रत्येक भारतीयाला एक युनिक हेल्थ आयडी (ID) मिळेल. पीएम नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन Pradhan Mantri Digital Health Mission)सुरू करणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी ही माहिती दिली आहे. युनिक हेल्थ आयडीमध्ये त्या व्यक्तीचे संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड असेल. ‘आरोग्य मंथन 3.0’चं उद्घाटन; 3 दिवस चालणार कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 मध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB PM-JAY) सुरू केली होती. या योजनेचा आज (23 सप्टेंबर 2021) तिसरा वर्धापनदिन आहे. 23 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी आयुष्मान भारत दिवस (Ayushman Bharat Divas) म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने या वर्षी 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर ‘आरोग्य मंथन 3.0’ (Arogya Manthan 3.0) या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाच्या कार्यक्रमाचं (Online and Offline programme) आयोजन करण्यात आलं आहे. हेही वाचा- पेगासस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SC चा मोठा निर्णय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्या आलं. तसंच या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानही ते भूषवतील, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (National Health Authority NHA) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली होती. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप 27 सप्टेंबर 2021 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन’ चं (PM-DHM) लोकार्पण करून होईल. आयुष्मान भारत (AB PM-JAY) योजनेने तीन वर्षांत केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आरोग्य मंथन 3.0 या तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे सीईओ डॉ. आर. एस. शर्मा, सदस्य डॉ. विनोद के. पॉल, आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण, एनएचएचे अतिरिक्त सीईओ प्रवीण गेडाम, एनएचएचे डेप्युटी सीईओ डॉ. विपुल अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असंही या पत्रकात म्हटलं आहे. हेही वाचा-  IPL 2021: अश्विनची बॉलिंग पाहून गंभीर नाराज, अनुभवी बॉलरला दिला 'हा' सल्ला देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थींशी (Beneficiary) मांडवीय यावेळी संवाद साधणार आहेत. मांडवीय यांच्या हस्ते एनएचएच्या वार्षिक अहवाल 2020-2021 चं प्रकाशनही केलं जाणार आहे. देशातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांत (States and Union Territories) सरकारची आयुष्मान भारत ही योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावेळी मांडवीय यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवरण्यात येणार आहे. त्याचबरोबर हॉस्पिटल हेल्प डेस्क किऑस्क, लाभार्थी गौरव एजन्सी, पीएम-जय कमांड सेंटर, नज युनिट आणि पीएम-जयचा सुधारित टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म यासारख्या सरकारच्या विशेष उपक्रमांचं उद्घाटनही केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय करतील.
  Published by:Pooja Vichare
  First published: