मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: अश्विनची बॉलिंग पाहून गंभीर नाराज, अनुभवी बॉलरला दिला 'हा' सल्ला

IPL 2021: अश्विनची बॉलिंग पाहून गंभीर नाराज, अनुभवी बॉलरला दिला 'हा' सल्ला

आयपीएल स्पर्धेत बुधवारी झालेल्या मॅचमध्ये (DC vs SRH) दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादवर 8 विकेट्सनं सहज विजय मिळवला. या विजयानंतरही टीम मॅनेजमेंटसाठी काळजीची गोष्ट या मॅचमध्ये घडली.

    मुंबई, 23 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) बुधवारी झालेल्या मॅचमध्ये (DC vs SRH) दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादवर 8 विकेट्सनं सहज विजय मिळवला. दिल्लीनं या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यानंतरही टीम मॅनमेंटला काळजी करणारी एक गोष्ट या मॅचमध्ये घडली. अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनला (R. Ashwin) हैदराबाद विरुद्ध एकही विकेट मिळाली नाही. अश्विनची हैदराबाद विरुद्धची बॉलिंग पाहून दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारा कॅप्टन गौतम गंभीर (Gautam Gambhir) नाराज झाला आहे. अश्विननं हैदराबाद विरुद्ध 2.5 ओव्हर्स बॉलिंग केली. त्यामध्ये त्यानं 22 रन दिले आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. मार्कस स्टॉईनिस बॉलिंग करताना जखमी झाल्यानं 9 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर ऋषभ पंतनं अश्विनला सर्वप्रथम बॉलिंग दिली होती. त्याच्या बॉलिंगवर पंतनं केन विल्यमसनचा कॅच सोडला. पण, तो अपवाद वगळता त्याला कोणतीही कमाल करता आली नाही. 'स्टार स्पोर्ट्स' वरील कार्यक्रमात बोलताना गंभीरनं अश्विनच्या बॉलिंगवर मत व्यक्त केलं आहे. ' तो सध्याचा क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम ऑफ स्पिनर आहे. पण त्यानं अजिबात ऑफ स्पिन टाकली नाही. आपण सर्वप्रथम ऑफ स्पिनर आहोत हे त्यानं समजलं पाहिजे. प्रतिस्पर्धी टीमच्या तीन किंवा चार विकेट्स गेल्यानंतर बॉलिंग करायला मिळणे ही त्याच्यासाठी आदर्श परिस्थिती होती. T20 World Cup 2021: अश्विनच्या समावेशाबाबत गावसकरांचा धक्कादायक दावा, म्हणाले... बराच काळ क्रिकेट न खेळल्यानं अश्विनवर दबाव असेल. तो इंग्लंड विरुद्ध चार टेस्ट बेंचवर होता. मॅच प्रेशर हे वेगळी गोष्ट आहे. असं असलं तरी, तुम्ही तुमची नेहमीची ऑफ स्पिन बॉलिंग सर्वप्रथम टाकायला पाहिजे,' असा सल्ला गंभीरनं यावेळी दिला. T20 World Cup 2021: टीम इंडियात निवड झाल्यानंतर अश्विन झाला इमोशनल, भावुक मेसेज केला शेअर अश्विननं आयपीएल स्पर्धेच्या पूर्वार्धात घरगुती कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर तो स्पर्धात्मक क्रिकेट मोजकंच खेळला आहे. टीम इंडियाच्या या अनुभवी ऑफ स्पिनरची आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये निवड झाली आहे. तब्बल चार वर्षांनंतर त्यानं मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. अश्विनच्या अनुभवाचा यूएईमधील स्लो पिचवर टीम इंडियाला उपयोग होईल, अशी आशा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Gautam gambhir, IPL 2021, R ashwin

    पुढील बातम्या