मुंबई 04 एप्रिल : देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत असून याच मुद्द्यावर चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उच्चस्तरीय बैठक (PM Taking a High Level Meeting) बोलावली आहे. या बैठकीत कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीकरणाबाबत चर्चा होत आहे. केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि डॉक्टर विनोद पॉल या बैठकीला उपस्थित आहेत. देशातील कोरोना रुग्णांची वाढती स्थिती लक्षात घेता आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा दृष्टीनं या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतात रविवारी कोरोनाच्या 93,249 नवीन रुग्णांची (Corona Cases in India) नोंद झाली आहे. या एका वर्षात एका दिवसात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यानंतर आता देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,24,85,509 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जारी करत माहिती दिली आहे. 18 सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच देशात एकाच दिवसात इतक्या अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार शनिवारी कोरोनामुळे 513 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही बाब लक्षात घेता कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगानं पसरताना दिसत आहे. कोरोनाच्या भयावह स्थितीचा अंदाज याच गोष्टीवरुन लावला जाऊ शकतो की देशा एका दिवसात 90 हजारहून अधिक रूग्ण समोर येत आहेत. मुंबई शहरात कोरोनाचे 9,108 नवे रुग्ण समोर आले आहेत. याआधी 17 सप्टेंबर 2020 ला महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक 24,619 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागानं म्हटलं, की 1,84,404 आणखी रुग्ण समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या 2,03,43,123 झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lockdown, Narendra modi, Pm modi