मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान मोदींनी ड्रोनद्वारे केली 6 शहरातल्या अत्याधुनिक Housing Project ची पाहणी

पंतप्रधान मोदींनी ड्रोनद्वारे केली 6 शहरातल्या अत्याधुनिक Housing Project ची पाहणी

चेन्नईपासून त्रिपुरातल्या आगरताळ्यापर्यंत देशातल्या वेगवेगळ्या 6 शहरांत विटा-सिमेंटशिवायच्या घरांचा Light House Project सुरू आहे. या वेगवेगळ्या राज्यांतलं काम मोदींनी ड्रोनद्वारे पाहिलं.

चेन्नईपासून त्रिपुरातल्या आगरताळ्यापर्यंत देशातल्या वेगवेगळ्या 6 शहरांत विटा-सिमेंटशिवायच्या घरांचा Light House Project सुरू आहे. या वेगवेगळ्या राज्यांतलं काम मोदींनी ड्रोनद्वारे पाहिलं.

चेन्नईपासून त्रिपुरातल्या आगरताळ्यापर्यंत देशातल्या वेगवेगळ्या 6 शहरांत विटा-सिमेंटशिवायच्या घरांचा Light House Project सुरू आहे. या वेगवेगळ्या राज्यांतलं काम मोदींनी ड्रोनद्वारे पाहिलं.

नवी दिल्ली, 3 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने लाईट हाऊस प्रकल्पाचा (Light House Project) आढावा घेतला. या देशव्यापी प्रकल्पाचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी ड्रोनव्दारे (Drone) घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 जानेवारी 2021 रोजी लाईट हाऊस प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला होता. या प्रकल्पात नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, या तंत्रज्ञानामुळे या गृह प्रकल्पांचं (Housing Project) काम वेगात पूर्ण होणार आहे.

अभियंता, आर्किटेक्ट यांना तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे होणार शक्य

लाईट हाऊस प्रकल्पाअंतर्गत देशातील 6 ठिकाणी हजारो घरे द्रुतगतीने उभारली जाणार आहेत. ही घरे इन्क्युबेशन सेंटर (Incubation Centre) ठरणार आहे. यामुळे देशातील प्लॅनर्स, आर्किटेक्ट, अभियंता आणि विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे आणि नवीन तंत्रज्ञानासोबत प्रयोग करणे शक्य होणार आहे.

बाळ रडलं की हलतो पाळणा; पाहा भारतीय तरुणाचा अनोखा शोध

6 प्रकल्पांची कामे सुरू

देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये 6 लाइट हाऊस प्रकल्पाची कामे सुरु असून, यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. याबाबत उदाहरण द्यायचे झाले तर मध्य प्रदेशातील इंदूर (Indore) मधील या प्रकल्पात विटा किंवा सिमेंटचा वापर न करता त्याऐवजी प्री फॅब्रिकेटेड सॅंडविच पॅनेल सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे.

राजकोटमध्ये फ्रेंच तंत्रज्ञानाचा वापर

गुजरातमधील राजकोटमधील लाईट हाऊसमधील घरं फ्रेंच तंत्रज्ञान (French Technology) आणि बोगद्याच्या सहाय्याने अखंड कॉंक्रिट बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारली जात आहेत. ही घरे कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यास अधिक सक्षम असतील.

Code Word मध्ये ED चे अधिकारी करीत होते लाखोंचा फ्रॉड; CBI ने असं रचलं जाळं

लखनौमधील प्रकल्पात कॅनडातील तंत्रज्ञान

उत्तर प्रदेशातील लखनौ (Lucknow) येथील लाईट हाऊस प्रकल्पात कॅनडातील (Canada) तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, या तंत्रज्ञानानुसार भिंतींना प्लॅस्टर करण्याची किंवा पेंट करण्याची गरज नाही.कारण इथं तयार भिंतींच वापरल्या जातील.

चेन्नईत यूएस आणि फिनलॅंण्डचे तंत्रज्ञान

तमिळनाडूतील चेन्नईमधील लाईट हाऊस प्रकल्पात युएस (US) आणि फिनलॅंड (Finland) येथील तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. या तंत्रज्ञानानुसार प्रीकास्ट कॉंक्रिट सिस्टीमचा वापर केला जात असल्याने घराची बांधणी वेगात आणि स्वस्तात होणार आहे.

रांचीत जर्मन तंत्रज्ञान वापरणार

झारखंडमधील रांची येथील लाईट हाऊस प्रकल्पात जर्मनीतील (Germany) 3D कस्ट्रक्शन सिस्टीमचा वापर करुन घरे उभारण्यात येणार आहेत. यात प्रत्येक खोली स्वतंत्रपणे बांधली जाईल आणि त्यानंतर संपूर्ण रचना लेगो ब्लॉक्सच्या खेळण्यांप्रमाणे जोडली जाणार आहे.

आगरतळ्यातील घरे बांधणीसाठी न्यूझीलंडचे तंत्रज्ञान

त्रिपुरामधील आगरतळ्यात या प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी न्यूझीलंडमधील (New Zealand) तंत्रज्ञानानुसार स्टील फ्रेम वापर केला जाणार आहे. यामुळे ही घरे भूकंपासारख्या आपत्तीला सक्षमपणे तोंड देऊ शकणार आहेत.

First published:

Tags: Drone shooting, Narendra modi, Pm modi