नवी दिल्ली, 3 जुलै : 104 कोटींचा बँक घोटाळा प्रकरण मिटविण्यासाठी 75 लाखांची लाच घेणारे ED चे उपनिर्देशक पूरन कामा सिंह आणि सहाय्यक निर्देशक भुवनेश कुमार यांना सीबीआयने दोन सहकाऱ्यांसह अटक केली आहे. विशेष म्हणजे ईडीचे अधिकारी कोड वर्डच्या माध्यमातून लाच मागत होते. (ED officials were committing millions of frauds ) CBI ने दिलेल्या माहितीनुसार, भ्रष्टाचार विरोधी शाखेकडे परेश पटेल नावाच्या व्यक्तीने तक्रार केली होती. त्याची एच एम इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि या कंपनीविरोधात सीबीआयने विविध गुन्हेगारी कलमांतर्गत बँक ऑफ बडोदा ब्रांन्चला 104 कोटी रुपयांचा चुना लावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. यानंतर प्रवर्तन निदेशालयानेदेखील सीबीआयच्या एफआयआरसह मनी लॉन्ड्रिंगच्या कलामांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर परेश पटेल यांवा ED ने चौकशीसाठी नोटीस पाठवली. त्यानुसार पटेल व त्यांचा मुलगा 22 एप्रिल आणि 25 मे रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याशिवाय सर्व संपत्ती ताब्यात घेऊ अशी धमकीही दिली. याशिवाय ईडीचे अधिकारी पूरन कामा सिंह यांनी निर्देशक भुवनेश कुमार यांच्या उपस्थितीत 75 लाखांची लाच मागितली. पैसे दिल्यानंतर मारहाण होणार नसल्याचंही सांगितलं. हे ही वाचा- वडील आणि भावांचं कृत्य पाहून हादराल; तरुणीला झाडावर लटकवून निघृणपणे मारहाण यावेळी दोघांकडून लाच मागण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोड वर्डचा वापर केल्याचं सांगितलं जात आहे. 1 किलोचा अर्थ 1 लाख..सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तक्रार मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाच मागितली जात असल्याचं त्यांनी सांगितलं, या आधारावर सीबीआयने या प्रकरणात लाच मागणे आणि षडयंत्र आखल्याबाबत गुन्हा दाखल केला. ईडीचे वरिष्ठ अधिकारी काय म्हणाले… पटेल आणि त्यांच्या मुलाला सांगण्यात आलं की, त्यांनी दिल्लीला जाऊन डिलिव्हरी करावी. तक्रारदाराने ही माहिती सीबीआयपर्यंत पोहोचवली. यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी 75 लाखांची लाज घेणाऱ्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं. ते पहिल्या तप्प्यात 5 लाखांची रक्कम घेत होते. ई़डीच्या अधिकाऱ्यांना सीबीआयने दिल्लीतून अटक केलं आहे. एका महिन्याच्या आता ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांक़डून लाच मागण्याच्या आरोपाखाली अटक होण्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी सीबीआयने बंगळुरूमध्ये तैनात ईडीचे सहाय्यक निर्देशकांना अटक केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.