जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बाळ रडलं की हलतो पाळणा; पाहा भारतीय तरुणाचा अनोखा शोध

बाळ रडलं की हलतो पाळणा; पाहा भारतीय तरुणाचा अनोखा शोध

बाळ रडलं की हलतो पाळणा; पाहा भारतीय तरुणाचा अनोखा शोध

जपानमध्ये एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी जितेंद्रला आमंत्रण देण्यात आलं होतं पण कोरोनामुळे तो कार्यक्रमच रद्द झाला.

    मुंबई 3 जुलै: राजस्थानातल्या जालोर (Jalore) जिल्ह्यातल्या एका 19 वर्षांच्या तरुणाने एक अनोखा पाळणा तयार केला आहे. लहान मुलाला पाळण्यात झोपवलं आणि बाळ रडायला लागलं तर आपोआप पाळणा हलायला लागतो. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे बाळानी शू केली किंवा काही हालचाल झाली तर लगेच पाळण्याला बसवलेला सायरन वाजायला लागतो. म्हणजे हा पाळणा घरोघरी पोहोचला तर आई आपलं घरकाम करता करता बाळाकडे उत्तमपणे लक्ष देऊ शकेल. गंमत वाटतेय ना? अहो या पाळण्याचा व्हिडिओ इंटरनेटवर (Viral video) प्रचंड व्हायरल झाला आहे. जालोर जिल्ह्यातल्या मडगावमधील मीठालाल मेघवाल यांचा मुलगा जितेंद्र मेघवाल (19 वर्षे) यानी हा पाळणा तयार केला असून त्याच्या या संशोधनाचं राष्ट्रीय स्तरावर कौतुक करण्यात आलं असून त्याचा गौरवही करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानावर अधिक अभ्यासासाठी जपानची स्कॉलरशीप पण मिळाली आहे. पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याला जाता येत नाही. दैनिक भास्करने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कुटुंबाने लेकीला झाडाला लटकवून जनावरासारखं मारलं; घटनेचा धक्कादायक VIDEO पाहून संताप होईल जितेंद्र म्हणाला, ‘मला पहिल्यापासून टेक्निकल शिक्षण (Technical Education) घ्यायचं होतं. ग्रामीण भागातील मजूर, शेतमजूर महिला काम करताना आजही झाडाला टांगलेल्या कापडाच्या झोळीच्या पाळण्यात बाळाला झोपवतात. त्यात बरेचदा मूल जागं होतं आणि शी-शू करतं. अशावेळी त्यांना काम सोडून मुलांकडे धाव घ्यावी लागते. मग माझ्या मनात आलं की बाळ रडायला लागलं की आपोआप पाळणा हलायला लागेल असा पाळणा तयार करूया. मी सातवीत होतो तेव्हापासून हा पाळणा तयार करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.’ प्रसिद्धीसाठी काहीही! नाल्यात झोपला तरुण; VIDEO काढताना झाली मोठी चूक अन्… जितेंद्र पुढे म्हणाला, ‘आयआयटी दिल्लीत (IIT Delhi) 14 ते 25 फेब्रुवारी 2015 ला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये देशातील निवडक 850 विद्यार्थ्यांनी आपापले प्रोजेक्ट सादर केले होते. त्यात मी पण होतो. त्यापैकी 60 जणांची निवड करण्यात आली त्यात माझीही निवड झाली. ’ जपानने दिलं आमंत्रण, पण… जपानमध्ये एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी जितेंद्रला आमंत्रण देण्यात आलं होतं पण कोरोनामुळे तो कार्यक्रमच रद्द झाला. त्याने मडगावातल्या शाळेतून 12 वी पास केली आहे. या पाळण्यामध्ये त्यानी सेन्सर बसवले आहेत त्यामुळे रडणं किंवा बाळाची हालचाल सेन्स करून ते काम करतात. रडण्यासंबंधीचा सेन्सर संकेत देतो तेव्हा पाळणा झुलायला लागतो. याबद्दल अधिक शिक्षण घेण्यासाठी त्याला जपानला जायचंय आणि त्या अभ्यासासाठी जपानी संस्थेने स्कॉलरशीप देऊन त्याला बोलवलंही आहे. पण त्याचे वडील मजुरी करतात त्यांच्याकडे मुलाला जपानला पाठवण्याएवढे पैसेही नाहीएत. जितेंद्रला या प्रोजेक्टचं पेटंट करायचं आहे पण तिथंही त्याला आर्थिक अडचणीच त्रास देत आहेत. जितेंद्रला पाच बहिणी आहेत. ही आहेत पाळण्याची वैशिष्ट्य 1) पाळण्यातलं बाळ रडायला लागलं की पाळणा आपोआप झुलतो. 2) पाळण्यात काहीही हालचाल झाली तर पाळण्याचा सायरन वाजतो आणि आईला सावध करतो. 3) जर आई बाळाला पाळण्यात झोपवून जवळपास कुठे कामाला गेली असेल आणि इतक्यात बाळ उठलं तर आईच्या फोनवर एसएमएस जाईल तसंच पाळण्यावर असलेल्या कॅमेराने शूट केलेला व्हिडिओही आईला फोनवर पाठवला जाईल. जेणे करून आई व्हिडिओ पाहून लगेच पाळण्याजवळ पोहोचेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात