मराठी बातम्या /बातम्या /देश /

'तिथल्या हिंदू, शिख बांधवांना...'; अफगाणिस्तानातील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

'तिथल्या हिंदू, शिख बांधवांना...'; अफगाणिस्तानातील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी म्हणाले (Narendra Modi on Afghanistan Crisis) भारतानं केवळ आपल्या नागरिकांचं रक्षण न  करता, भारतात येण्याची इच्छा असलेल्या शिख आणि हिंदू अल्पसंख्यांकांचेही रक्षण करावं

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 18 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) हाती सत्ता आल्यानंतर त्याबाबत भारताची (India's stand) भूमिका ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) निवासस्थानी (residence) पार पडली. यात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की येत्या काही दिवसात अफगाणिस्तानात अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक पावले उचला. एका वरिष्ठ सूत्रानं सांगितलं, की पंतप्रधान मोदी म्हणाले (Narendra Modi on Afghanistan Crisis) भारतानं केवळ आपल्या नागरिकांचं रक्षण न करता, भारतात येण्याची इच्छा असलेल्या शिख आणि हिंदू अल्पसंख्यांकांचेही रक्षण करून त्यांना आश्रय द्यायला हवा. यासोबतच आपल्याला त्या अफगाण बांधवांचीही मदत करायला हवी, जे भारताकडे मदतीची मागणी करत आहेत. तालिबानबाबत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण हेदेखील उपस्थित होते. देशातून बाहेर असल्यामुळे या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित राहू शकले नाहीत. सरकारमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीला अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती, सुरक्षा आणि राजकीय परिस्थितीविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली. या समितीला भारतीय दूतावासाचे अधिकारी, भारतीय समुदायाचे काही सदस्य आणि भारतीय माध्यमांच्या व्यक्तींना बाहेर काढण्याबाबत माहिती देण्यात आली. निर्मला सीतारामन: टीकेचं लक्ष्य बनूनही अर्थमंत्रिपद कसं राहिलं कायम तालिबानने रविवारी काबूलमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला. सूत्रांनी सांगितलं, की भारत सरकार अफगाणिस्तानमधील सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी ते वेळोवेळी अॅडव्हायजरी जारी करत आहेत, ज्यात त्यांना त्वरित भारतात परत येण्याचे आवाहन केलं जात आहे.
First published:

Tags: Afghanistan, PM narendra modi, Taliban

पुढील बातम्या