जाहिरात
मराठी बातम्या / देश / PM Narendra Modi Mother : पंतप्रधान मोदी यांच्या विजयाचं सिक्रेट 'आईचे आशीर्वाद'

PM Narendra Modi Mother : पंतप्रधान मोदी यांच्या विजयाचं सिक्रेट 'आईचे आशीर्वाद'

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी लाखमोलाचे आईचे हे आशीर्वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी लाखमोलाचे आईचे हे आशीर्वाद

PM Narendra Modi Mother : पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी लाखमोलाचे ठरले आईचे हे आशीर्वाद, पाहा फोटो

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : कोणत्याही यशस्वी कामासाठी आईचे आशीर्वाद फार महत्त्वाचे असतात असं म्हणतात ते उगाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मोठ्या कामाआधी आईचे आशीर्वाद घेणं सोडलं नाही. मग गुजरात विधानसभा निवडणूक असो किंवा पंतप्रधान पदासाठीची. जेव्हा 2014 मध्ये पंतप्रधानपदी मोदी यांची निवड झाली तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. आता गुजरात विधानसभा निवडणुकीआधी देखील त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले. या आईच्या आशीर्वादाची ताकद फार मोठी असते हे पुन्हा एकदा संपूर्ण जगानं पाहिलं. विधानसभा निवडणूक असो किंवा राज्यसभेची पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी त्यांच्या आईचे आशीर्वाद सर्वात महत्त्वाचे ठरले आहेत. गुजरातमध्ये 4 सप्टेंबर डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर इथे आईची भेट घेण्यासाठी गेले होते.

आई आणि मुलाचं अतूट नातं; PM मोदींचे यांच्या आईसोबतचे हे खास फोटो बघितले का?

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले होते. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये पाहून शकता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोपटी रंगाचा झब्बा घातला आहे. खांद्यावर शाल आहे.

News18

एएनआयने देखील 4 डिसेंबर रोजी आईसोबत खास क्षण घालवतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ते आईसोबत गप्पा मारत चहा घेत आहेत. हिराबेन त्यांची आई त्यांना काहीतरी सांगत आहे. ते चहा घेत आईचं बोलणं शांतपणे ऐकत असल्याचं दिसत आहे.

Heeraben Modi Health Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

News18

News18

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर आईचे आशीर्वाद घेतले. 4 डिसेंबरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आईचे ते आशीर्वाद नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक हिम्मत आणि मोठं पाठबळ आहे.

जाहिरात

News18

News18लोकमत
News18लोकमत

गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान झालं होतं. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी निवडणुकीचे निकाल आले. हे निकाल देशाला माहिती होते. गुजरातमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला, हे संपूर्ण देशानं पाहिलं. पहिल्यांदाच भाजप 150 हून अधिक जागांनी निवडून आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात