• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ''मला पंतप्रधान मोदींचा फोन आला आणि मी...''

''मला पंतप्रधान मोदींचा फोन आला आणि मी...''

Man Ki Baat: पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशमधल्या एका रहिवाशाला मोबाईलवर कॉल केला. त्यांनी मोदींनी केलेल्या कॉलचा अनुभव सांगितला आहे.

 • Share this:
  उत्तर प्रदेश, 31 मे: रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात (Man Ki Baat)या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशमधल्या एका रहिवाशाला मोबाईलवर कॉल केला. दिनेश उपाध्याय असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींनी ( PM Narendra Modi) केलेल्या कॉलचा अनुभव सांगितला आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील हसनपूर जमुआ गावात दिनेश कुमार उपाध्याय राहतात. रविवारी दिनेश यांच्या मोबाईलवर एक फोन आला. दिनेश यांनी फोन उचलताच समोरुन गंभीर असा आवाज ऐकायला आला. मी नरेंद्र मोदी बोलतोय. तुम्ही कसे आहात? असं ऐकताच दिनेश यांना विश्वासच बसला नाही आणि ते 10- 15 सेंकद निशब्द झाले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की मला देशाच्या पंतप्रधानांचा फोन आला आहे. दिनेश यांनी फोनचा अनुभव शेअर केला आहे. पंतप्रधानांचा फोन येणं हे माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. एकदम साध्या भाषेत आणि सहज असा पंतप्रधानांनी माझ्याशी संवाद साधला यावर मला विश्वासच बसत नाही आहे. आम्हाला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गर्व आहे. फोन केल्यानंतर सुरुवातील पंतप्रधानांनी माझी तसंच माझ्या कुटुंबाची आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल विचारलं. त्यानंतर त्यांनी मला काही प्रश्न विचारले. कोविड 19 मुळे मुलांचं शिक्षण ऑनलाईन होतं आहे का? ऑक्सिजन घेऊन जाताना कसली भीती वाटत नाही का? हे कार्य करत असताना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास काही अडचण होत नाही ना? मुलांना खूप चांगलं शिक्षण द्या, तुम्ही जे कार्य करत आहात ते खूप महत्त्वाचं आहे. कोरोनाच्या काळात मोठी जबाबदारी तुम्ही सांभाळत आहात, असं मोदी म्हणाले. हेही वाचा- वाईट! संशयावरुन एकाचा घात, बेदम मारहाणीत जमावाकडून एकाची हत्या कोण आहेत दिनेश उपाध्याय दिनेश उपाध्याय हे गेल्या 15 वर्षांपासून ऑक्सिजन टँकर चालवत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या दिनेश यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मोठा भाऊ कमलेश उपाध्याय यांच्याकडे आले. त्यांचा मोठा भाऊ कमलेश देखील स्वतः ऑक्सिजन टँकर चालवण्याचं काम करतात. दिनेशचं कुटुंब त्यांच्या गावी राहतं. गावी त्यांची पत्नी निर्मला, मुलगा आर्यन, मुलगी सोनी आणि प्रिती राहतात. काल सकाळी 7 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोना आला. त्यावेळी दिनेश गुजरातच्या पंचमहल परिसरात टँकर उभा करून चहा पित होते. मोदींकडून कामाचं कौतुक पंतप्रधानांनी दिनेश यांच्याशी जवळपास 5 मिनिटांचा संवाद साधला. या संवादात त्यांनी दिनेश यांच्या कामाचं कौतुक केलं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. पंतप्रधानांनी केलेला फोन म्हणजे माझ्या कामाची पावती असल्याचं दिनेश सांगतात. गेल्या 15-17 वर्षांपासून मी ऑक्सिजन टँकर चालवत आहे. पण यापूर्वी माझ्या कामाचं कोणाला महत्त्वं नव्हतं. सामान्य ड्रायव्हरप्रमाणे लोकं आमच्याशी वागायचे. वाहतूक कोंडी झाल्यानंतर आम्हाला अनेक तास ताटकळत उभं राहावं लागत होतं. मात्र कोरोनामुळे लोकांना ऑक्सिजनचं महत्त्वं समजलं आहे. आता वाहतूक कोंडी झाली तरी प्रशासनाच्या मदतीनं काही मिनिटांत टँकर पुढे जातं, असं ते म्हणालेत. हेही वाचा- खतरनाक! देशात पेट्रोलच्या दरानं गाठली उच्चांकी, किंमत ऐकून बसेल धक्का ऑक्सिजनचा टँकर हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यानंतर सन्मान मिळतो. पण त्याहून जास्त आनंद होतो जेव्हा आपण आणलेल्या ऑक्सिजनमुळे कोणाचा तरी जीव वाचतो, असं दिनेश यांनी म्हटलं आहे. रुग्णांचे नातेवाईक हातवर करुन टाळ्या वाजवतात तसंच आमच्या कामाचं कौतुक करतात, असंही ते सांगतात. पंतप्रधान मला म्हणाले की, तुम्ही जे काम करत आहात ते खूप कौतुकास्पद आहे. कुटुंबाची चिंता न करता तुम्ही देश आणि समाजासाठी पुढे आलात आणि काम करता आहात. तुमच्या या कामामुळे लाखोंचे जीवन वाचवत आहात. कोरोनाच्या काळात तुमच्या खांद्यावरील जबाबदारी वाढली आहे. निष्ठेनं तुम्ही देशाची सेवा करत असल्याचं मोदींनी म्हटलं, असं दिनेश उपाध्याय यांनी सांगितलं.
  Published by:Pooja Vichare
  First published: