नवी दिल्ली, 31 मे: देशात पेट्रोल -डिझेलच्या किंमतीनं नवा उच्चांक गाठला आहे. देशात पहिल्यांदा पेट्रोलच्या दरानं 105 असा आकडा पार केला आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत 105 रुपये अशी आहे. तर डिझेलसाठी 98 रुपये मोजावे लागत आहेत. प्रतिलीटरसाठी ही किंमत आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दोन दिवसांपूर्वी पेट्रोलनं (Petrol price) शंभरी गाठली होती.त्यानंतर दोन दिवसांनंतरही पेट्रोलचे दर जैसे थेच होते. आज मुंबईत पेट्रोल किंमत 100.47 इतकी झाली आहे. मुंबईत आज प्रति लिटरसाठी ग्राहकांना 100.47 असे पैसे मोजावे लागत आहेत. एनआयए या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. डिझेलच्या किंमतीने देखील नवा उच्चांकी आकडा गाठला आहे. मुंबईत डिझेलचे दर (Diesel price) 92. 45 रुपये आहे.
Price of petrol & diesel in #Delhi at Rs 94.23 per litre and Rs 85.15 respectively.
— ANI (@ANI) May 31, 2021
Petrol & diesel prices per litre - Rs 100.47 & Rs 92.45 in #Mumbai, Rs 102.34 & Rs 93.37 in #Bhopal and Rs 94.25 & Rs 87.74 in #Kolkata pic.twitter.com/XKiVykFBJT
दिल्लीत पेट्रोलसाठी 94.23 तर डिझेलसाठी 85.15 रुपये मोजावे लागत आहेत. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशच्या अनूपनगरमध्ये 104.94 पेट्रोल आणि डिझेल 96.03 ला मिळत आहेत. रोजच्या इंधनवाढीमुळे नागरिकही त्रस्त झालेत. हेही वाचा- काळजी घ्या! राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यात घोंघावतेय कोरोनाची तिसरी लाट राज्यांमध्ये असे आहेत पेट्रोलचे दर चेन्नई - पेट्रोल 95.76 रुपये डिझेल 89.90 रुपये कोलकात्ता- पेट्रोल 94 रुपये, डिझेल 88 रुपये भोपाळ- पेट्रोल 102.34 रुपये, डिझेल 93.65 रुपये लखनऊ- पेट्रोल 91.63 रुपये, डिझेल 85.54 रुपये बंगळुरु- पेट्रोल 97.37 रुपये, डिझेल 90.27 रुपये पाटणा- पेट्रोल 96.38 रुपये, डिझेल 90.42 रुपये रांची- पेट्रोल 90.84 रुपये, डिझेल89.91 रुपये जयपूर- पेट्रोल 100.75 रुपये, डिझेल 93.95 रुपये