मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

फक्त संशय आला; ठाण्यात जमावाकडून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू 

फक्त संशय आला; ठाण्यात जमावाकडून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू 

Thane Crime: ठाणे  जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ठाण्यात रविवारी एक व्यक्तीला जमावानं बेदम मारहाण केली.

  • Published by:  Pooja Vichare
ठाणे, 31 मे: ठाणे (Thane) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अपहरणकर्ता समजून जमावानं एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ठाण्यात रविवारी एक व्यक्तीला जमावानं बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. नेमकी काय घडलं? अटक केलेल्यांपैकी अटक केलेल्यांपैकी एका व्यक्तीला हा अपहरणकर्ता असल्याचा संशय आला. आपल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्या व्यक्तीला वाटलं, असं पोलिसांनी सांगितलं. याच संशयावरुन पुढील घटना घडली. दरम्यान या घटनेतील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. हेही वाचा- काळजी घ्या! राज्यातल्या 'या' जिल्ह्यात घोंघावतेय कोरोनाची तिसरी लाट वागळे इस्टेटमध्ये रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. पीडित रामअवतार धोबी हा अपहरणकर्ता असल्याचा संशय एक आरोपीला आला. धोबी हा आपल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं एका आरोपीला वाटलं. आरोपीनं आरडाओरड करत आजूबाजूच्या लोकांना एकत्र केलं. त्यानंतर जवळपास 10 लोकांच्या जमावानं रामअवतार याला बेदम मारहाण केली. ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हेही वाचा- खतरनाक! देशात पेट्रोलच्या दरानं गाठली उच्चांकी, किंमत ऐकून बसेल धक्का पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. अतीक खान, मोहसीन शेख, अफसर वास्ता, हरीश सोलंकी आणि मोहम्मंद अन्सारी अशी आरोपींची नावे आहे. तर अन्य आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
First published:

Tags: Thane, Thane crime news

पुढील बातम्या